Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market : म्हापसा भाजी मार्केटच्या छताला गळती; पालिकेकडून आश्‍वासनेच

म्हापसा व बार्देश तालुक्यातील ग्रामीण भागात झाडांच्या पडझडीच्या अनेक घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa : म्हापसा आणि आसपासच्या भागात शुक्रवारी (ता.७) मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. म्हापसा व बार्देश तालुक्यातील इतर ग्रामीण भागात झाडांच्या पडझडीच्या अनेक घटना घडल्या. तर पावसामुळे म्हापसा मार्केटमधील भाजी मार्केटच्या छताला गळती लागल्याने ग्राहकांसह भाजी मार्केट विक्रेत्यांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पालिका मार्केटमधील भाजी मार्केटच्या छताला गळती लागली असून त्यामुळे पावसाचे पाणी भाजी मार्केटच्या आवारात शिरत आहे. परिणामी, ग्राहकांसह विक्रेत्यांनाही मनस्ताप होत आहे. ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी भाजी विक्रेते भाजी मंडईतील साचलेले पाणी साफ करताना शुक्रवारी दिसत होते.

पालिकेकडून आश्‍वासनेच

एका विक्रेत्याने सांगितले की, छताला कुठेतरी गळती लागल्याने पावसाचे पाणी आतमध्ये गळत असल्याची आम्हाला कल्पना आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही म्हापसा पालिकेकडे या समस्या मांडत आहोत. परंतु, आश्वासनांव्यतिरिक्त अद्याप काहीही मिळालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT