Goa School : बायणा येथील सरकारी विद्यालयाची इमारत धोकादायक; विद्यार्थी व शिक्षक भीतीच्या छायेत

जेटी-बोगदा येथे करणार स्थलांतर ; झुआरीनगरातही टांगती तलवार
Goa School
Goa School Dainik Gomantak
Published on
Updated on

Vasco : येथील सरकारी प्राथमिक - माध्यमिक (मेन) विद्यालयाच्या इमारतीनंतर आता बायणातील सरकारी विद्यालयाची इमारत धोकादायक ठरल्याने तेथील विद्यार्थ्यांची सोय जेटी बोगदाच्या सरकारी विद्यालयाच्या इमारतीमध्ये करण्याची योजना आखली असून लवकरच या शाळेतील विद्यार्थ्यांचे तेथे स्थलांतर होणार असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.

गेल्या आठवड्यात वास्को येथील (मेन) सरकारी प्राथमिक माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक ठरल्याने तेथील विद्यार्थ्यांची सोय मांगोरहील येथे सरकारी शाळेत केली आहे, तर प्राथमिक विभागाचे वर्ग मुरगाव तालुका साहाय्यक भागशिक्षणाधिकारी कार्यालयात घेण्यात येत आहेत. वास्को मेन शाळेच्या मुख्य दरवाजावरील छप्पराचा काही भाग, असेच वर्गातील छप्पराचे प्लास्टर कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच वर्गाच्या भिंतींना विजेचा धक्का बसत असल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतर मांगोरहील येथील सरकारी विद्यालयाच्या इमारतीत केले आहे.

Goa School
Goa News - घाट परिसरातील कोकणी लोकांशी कोकणी परिषदेने जोडले पाहिजे - दामोदर मावजो | Gomantak Tv

बायणा येथील सरकारी विद्यालयाच्या धोकादायक इमारतीत विद्यार्थी व शिक्षक भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. बायणातील सरकारी विद्यालयाची इमारत धोकादायक बनल्याने तेथील विद्यार्थ्यांची सोय जेटी-बोगदा येथील सरकारी विद्यालयाच्या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

Goa School
Deaths by Drowning in Goa: राज्यात वर्षभरात 36 जणांचा बुडून अंत; जुलै महिन्यात 6 जणांचा मृत्यू

झुआरीनगरातही टांगती तलवार

झुआरीनगर येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांच्या इमारतींच्या छप्परांनाही गळती लागली आहे. या विद्यालयांच्या छप्पराच्या लाकडी साहित्याला वाळवी लागल्याने ते कमकुवत झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या इमारतींच्या दुरुस्तीची गरज आहे. जर या गळतीकडे योग्यवेळी लक्ष देऊन दुरुस्ती केली नाही तर अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com