Illegal Construction in Mapusa Dainik Gomantak
गोवा

'अनधिकृत बांधकाम 15 दिवसात तोडून टाका'

म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिताराम सावळ यांचे गोवा बागायतदार संस्थेला आदेश

दैनिक गोमन्तक

म्हापसा : म्हापशातील धुळेर, शेट्येवाडोयेथील राज रौनक या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेले गोवा बागायतदार बाजार या आस्थापनाचे बेकायदा आणि अनधिकृत बांधकाम पंधरा दिवसाच्या आत हटवावे अथवा तोडून टाकावे असा आदेश म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिताराम सावळ यांनी दिला आहे. तक्रारदार सिद्धी नाईक यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार धुळेर म्हापसा येथील राज रौनक ही इमारत राजमी राजेश नार्वेकर यांच्या मालकीची असून त्यांनी या इमारतीच्या तळ मजल्यावर बेकायदा उपमाजला बांधला, तसेच इमारतीच्या चारही बाजूला कोणतेही सेटबॅक न सोडता तेथे लोखंडी खांब व पत्रे घालून बांधकाम करण्यात आले आहे. तसेच बेकायदेशीर बांधकाम गोवा बागायतदार बाजार या नामांकित संस्थेस भाडेतत्वावर दिले गेले आहे. इमारतीच्या आत पार्किंगची सोय नसल्याने येणारे ग्राहक रस्त्यावर पार्किंग करतात. या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते जवाहरलाल शेट्ये आणि सिद्धी नाईक यांनी 7 ऑक्टोबर 2019 रोजी म्हापसा नगरपालिकेकडे या बेकायदेशीर बांधकामबद्दल तक्रार दिली होती.

तक्रारीची दखल घेत म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिताराम सावळ यांनी सदर बांधकाम गोवा नगरपालिका कायदा 1968 च्या 184(8) कलमानुसार बेकायदेशीर ठरवून बांधकामकर्त्यांनी सदर बेकायदा बांधकाम हा आदेश दिल्यापासून पंधरा दिवसांच्या आत हटवावे किंवा तोडून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास म्हापसा नगरपालिकेला बांधकाम हटवावे लागेल आणि येणारा खर्च वसूल केला जाईल असेही दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT