उद्योगांना फक्त दीड महिन्यांत देणार चालणार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत; कुंडईतील बायोटिक कचरा प्रकल्पाचे उद्‍घाटन
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

पणजी : गोव्यात उद्योग व्यवसायासाठी योग्य साधनसुविधा उपलब्ध आहे. मात्र, एखाद्या उद्योजकाला आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी वर्ष दोन वर्षे लागत असेल, तर ते गैर असून अवघ्या दीड महिन्यांत उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार असून प्रशासनाला त्यादृष्टीने ‘गिअरअप’ करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कुंडई औद्योगिक वसाहतीत बायोटिकतर्फे उभारण्यात आलेल्या वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज शुक्रवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री बाबूश मोन्सेरात, कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष डॉ. लेविन्सन मार्टिन्स तसेच गोवा प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील व बायोटिक प्रकल्पाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

एखादा उद्योग सुरू करण्यासाठी वेळकाढू धोरण अवलंबले जाता कामा नये. उद्योजकांना रखडवले जात असेल तर गोव्यात उद्योग व्यवसाय वाढणार नाही, त्यामुळेच दीड महिन्यांच्या आत सर्व सोपस्कार पूर्ण करून अशा उद्योगाच्या प्रकल्पाचे काम सुरू व्हायला हवे. प्रशासन त्यासाठी कार्यरत राहणार असून कचरा निर्मूलनात गोवा राज्याने केलेली कामगिरी चमकदार असून इतर कोणत्याही राज्यात नसेल एवढ्या अद्ययावत सुविधांनी युक्त कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून तयार केलेले प्रकल्प म्हणजे पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरावे आणि असे प्रकल्प हे पर्यटकांसाठी पर्यटन केंद्र व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

Goa CM Pramod Sawant
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपाळ चितारी कालवश

कुंडई येथील बायोटिकचा प्रकल्प म्हणजे बांधा आणि वापरा या धर्तीवर कार्यरत राहणार आहे. राज्यातील कचरा प्रकल्पांच्या कार्यान्वितीत आमदार झाल्यापासून आपला सक्रिय सहभाग राहिला असल्याचे सांगून या प्रकल्पासाठी सरकारचा एकही पैसा खर्च करण्यात आलेला नाही, उलट राज्यातील वैद्यकीय कचऱ्यावर व्यवस्थित प्रक्रिया करून या कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात येत असल्याने स्वच्छ, सुंदर गोव्याच्या संकल्पनेसाठी ती एक अपूर्व अशी पर्वणीच ठरली असल्याचे प्रमोद सावंत म्हणाले.
मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुंदर गोव्याची संकल्पना पूर्ण होण्यास मदतच होणार असल्याचे सांगून बायोटिकच्या उपक्रमाचे मोन्सेरात यांनी कौतुक केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनीही कचरा प्रक्रिया प्रकल्पांमुळे सुंदर गोव्याची प्रतिमा अबाधित राहील अशी आशा व्यक्त केली. स्वागत व सूत्रसंचालन डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी केले.

Goa CM Pramod Sawant
अमेरीकास्थित गोवेकराने कोकणीला नेले गुगलवर

वास्तविक स्वच्छ सुंदर गोव्याची प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी वीस वर्षांपूर्वीच अशाप्रकारचे निर्णय घेणे अपेक्षित होते. मडगाव व इतर भागातील कचऱ्याचे ढीगारे पाहता वीस वर्षांपूर्वी कचऱ्याचे गांभीर्यच तत्कालीन सरकारला कळले नाही. ज्या काळात सरकारची तिजोरी भरून वाहत होती, अशा वेळेला निर्णय क्षमता सिद्ध झाली नाही आणि आता कचऱ्याचा भस्मासूर उभा राहिल्यावर सरकारवर हेच लोक टीका करतात, हे काय प्रकरण, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com