Mapusa Municipality| Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: म्हापसा नगरपालिकेत लवकरच होणार उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक

म्‍हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी येत्या बुधवार दि. 15 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipality: म्‍हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी येत्या बुधवार दि. 15 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. चंद्रशेखर बेनकर यांचा उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर झाल्‍यानंतर आता पालिका संचालकांनी या निवडणुकीसंदर्भात नोटीस जारी केली आहे.

सत्ताधारी गटाकडून नगरसेवक विराज फडके यांच्‍या नावावर शिक्कामोर्तब करण्‍यात आले आहे.

मिळलेल्‍या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात डीएमएने बैठक बोलावली असून तिथे उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

सत्ताधारी गटाकडून नगरसेवक विराज फडके यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केल्याचे समजते तर विरोधी गटाकडून कुणी अर्ज करणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडे एकूण 20 पैकी 14 नगरसेवकांचे संख्याबळ आहे.

दरम्‍यान, अलीकडेच नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीसाठी विरोधी गटाकडून उमेदवारी दाखल झाली नव्हती. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या प्रिया मिशाळ यांची नगराध्यक्षा म्हणून बिनविरोधी निवड झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

SCROLL FOR NEXT