Fish Festival: फिश फेस्टिवलमुळे मोठी वाहतूक कोंडी

मत्‍स्य महोत्सवाला हजेरी लावणाऱ्यांच्या वाहनांमुळे पुन्हा वाहतूक कोंडीचे प्रकार सुरू झाले आहेत.
|Fish Festival |Goa Traffic
|Fish Festival |Goa Traffic Dainik Gomantak
Published on
Updated on

Fish Festival: कला अकादमीच्या परिसरात नुकताच आयोजिलेला लोकोत्सव संपला, तोच मच्छिमार खात्याच्या वतीने कांपाल येथील ‘साग’ मैदानावर मत्स्य महोत्सव आयोजित केला आहे. काही दिवसांपूर्वी लोकोत्सवामुळे बांदोडकर मार्गावर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता.

आता या मत्‍स्य महोत्सवाला हजेरी लावणाऱ्यांच्या वाहनांमुळे पुन्हा वाहतूक कोंडीचे प्रकार सुरू झाले आहेत. सायंकाळी सहानंतर रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहनचालक बेजार झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

वाहतूक सुरळीत करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते वाहतूक पोलिस कुठे दिसेनासे झाले होते. त्यामुळे बांदोडकर मार्गावर पदपथावर वाहनधारकांनी कशीही वाहने उभी केली होती. त्याचा फटका या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना कोंडीमुळे बसला.

उभ्या केलेल्या वाहनांना वाहने धडकण्याची भीती असल्याने अनकेजण वाहने सावकाश हाकत होती. असाच प्रकार यापूर्वी लोकोत्सवात पहायला मिळाला होता.

|Fish Festival |Goa Traffic
Goa News: 'गोव्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मात्र आमचे मुख्यमंत्री फक्त...'

अगोदरच पणजीतील अनेक रस्त्यांवर स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ते खोदलेले आहेत. पणजी सांतिनेजकडून करंझाळे टोंककडे जाणाऱ्या वाहनधारकांना आपली वाहने मिरामारमार्गे न्यावी लागत आहेत, त्यांचीही बांदोडकर मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये भर पडली आहे.

वाहतुकीला शिस्त लावणारे पोलिस नसल्याने वाहनचालक कोठेही वाहने उभी करीत होते. खरेतर महोत्सव सुरू असताना वाहतूक कोंडीकडे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असताना संबंधित खात्याने त्याकडे का लक्ष दिले नाही, हे कळत नाही.

साग मैदानावरील अर्धी जागा पार्किंगसाठी अपुरी पडल्यामुळेच वाहने कोठेही उभी करण्याची वेळ वाहनधारकांवर आली असल्यालेच स्पष्ट होते.

|Fish Festival |Goa Traffic
Goa News: ...यामुळे साळेरीवासीयांचा पोलिस ठाण्‍यावर मोर्चा

‘ये रे माझ्या मागल्या’

या प्रभागातील स्वीकृत नगरसेवक कबिर पिंटो माखिजा हे सतत बांदोडकर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीविषयी महापालिकेत विषय मांडत असतात. बांदोडकर फुटबॉल मैदान व कला अकादमी त्यांच्या घरासमोर असल्याने या ठिकाणी होणाऱ्या विविध महोत्सवामुळे वाहनांच्या पार्किंगचा त्रास त्यांना आणि येथील नागरिकांना सहन करावा लागतो.

येथील नागरिक नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे करतात. यापूर्वी त्यांची बहीण नगरसेविका होती, त्यावेळी त्यांच्या बहिणीकडे नागरिक तक्रार करायचे. येथील पार्किंगविषयी पोलिसांच्या वाहतूक विभागाला सूचना कराव्यात, असे कबीर सांगतात, पण त्यांच्या तक्रारीकडे एखाद्यावेळी गंभीरपणे पाहिले जाते, अन्यथा आजचा प्रकार म्हणजे ‘ये रे माझ्या मागल्या’सारखाच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com