MAPUSA MUNICIPAL COUNCIL Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: म्हापसा नगरपालिकेची पोटनिवडणूक जुलै महिन्यात

पोटनिवडणूकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

Rajat Sawant

म्हापसा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवक तारक आरोलकर यांचा ओबीसी दाखला अवैध ठरविल्याने नगरविकास खात्याच्या संचालकांनी नगरसेवक म्हणून अपात्र घोषीत केले.

रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक पदासाठीच्या पोटनिवडणूकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. पोटनिवडणूकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

नगरपालिका कायदा कलम 50 अंतर्गत प्रभाग 7ची रिक्त जागा भरण्याची सूचना पत्राद्वारे नगरपालिका खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

तारक आरोलकर अपात्र झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. म्हापसा पालिकेच्या प्रभाग 7 मध्ये जुलै महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे.

ओबीसी राखीव असलेला म्हापसा पालिका प्रभाग 7 मधून तारक आरोलकर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांनी समाजकल्याण विभागाच्या तीन सदस्यीय छाननी समितीकडे आरोलकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रार केली होती.

समाज कल्याण विभागाच्या छाननी समितीच्या निर्देशानंतर आरोलकर यांचा जातीचा दाखला बार्देश उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी रद्द केला होता. यानंतर आरोलकर यांना अपात्र ठरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT