Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा श्‍‍वास कोंडतोय!

अवस्‍था दयनीय : पोतुर्गीजकालीन बाजारपेठ; अस्‍ताव्‍यस्‍त कारभार, विक्रेते वाढले भरमसाठ

Shreya Dewalkar

Mapusa Market: उत्तर गोव्यातील म्हापसा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले पोतुर्गीजकालीन म्हापसा पालिका मार्केट हे पारंपरिक विक्रेत्यांना उदरनिर्वाह उपलब्ध करून देणारी जगप्रसिद्ध मुख्य बाजारपेठ. मात्र या बाजारपेठेची सध्या दुरवस्था झाली असून, ती आपल्या पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत आहे. तर, दुसरीकडे येथील मार्केटमध्ये अनियंत्रित विक्रेत्यांचा भरणा झाल्‍यामुळे सदर मार्केटचे सौंदर्यच नष्ट झाले आहे.

या बाजारपेठेचा श्‍‍वास दिवसेंदिवस कोंडला जात असून, पारंपरिक विक्रेत्यांची संख्या घटत चालली आहे.

म्हापसा पालिका मार्केट पोर्तुगीजकाळात बांधलेली नियोजित बाजारपेठ. सदर मार्केट केवळ शुक्रवारच्या आठवडी बाजारासाठीच प्रसिद्ध नव्हे, तर देशातील सर्वांत संघटित बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. आपल्‍या विशिष्‍ट रचनेमुळे ते पर्यटकांनाही आकर्षित करते. मात्र कालांतराने या संरचनेकडे दुर्लक्ष झाले व ती कमकुवत बनली.

दुकानदारांनी आपापल्या भागात काही दुरुस्तीचे काम केले असले तरी गळतीचे प्रकार थांबलेले नाहीत. शिवाय ठिकठिकाणी स्लॅबचे तुकडे मोडून पडल्याचे आढळतात. अनेक दुकानांचा लिलाव होणे बाकी आहे. यातून पालिकेचा महसूल वाढेल.

सध्या मार्केटच्या पुनर्विकास व पुनर्वैभवासाठी वास्तुविशारदांची नियुक्ती केली आहे, ज्यांनी संपूर्ण बाजारपेठेचा तपशीलवार आराखडा तयार केला होता. मध्यंतरी हा आराखडा नगरसेवकांना तसेच शहरातील प्रतिष्‍ठित नागरिकांना दाखविण्यात आला. मात्र त्यानंतर कामास चालना किंवा अपेक्षित गती मिळालेली दिसत नाही.

अर्थसंकल्‍पात 10 कोटींची तरतूद

म्हापसा पालिकेच्या मार्केट व आजूबाजूच्या परिसराचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली. त्यानुसार, बाजारपेठेच्या पुनर्विकास योजनेला नवीन जीवन देण्याच्या अनुषंगाने, गोवा राज्य नागरी विकास एजन्सीला हे काम दिले आहे. म्हापसा मार्केटच्या पुनर्विकासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनीही म्हापसा पालिका मार्केटचा पुनर्विकास करण्याची योजना आखली होती. २०१७-१८च्या अर्थसंकल्पात त्यांनी या मार्केटच्या विकासासाठी विशेष अनुदान म्हणून २० कोटी रुपयांची तरतूद केली होती.

  • म्हापसा पालिका मार्केटमधील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची वाताहत झालेली आहे. त्‍यांची तातडीने दुरुस्ती गरजेची.

  • काही गटारांवरील स्लॅब (झाकणे) उंच-सखल म्‍हणजेच असमान असल्याने वयस्कर मंडळींचा जीव धोक्‍यात.

  • रात्री नऊनंतर मार्केटमध्ये अंधार पसरलेला असतो. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे चालत नाहीत. सुरक्षेचा प्रश्न गंभीर.

  • पार्किंगची मोठी समस्या, मात्र पालिकेचे दुर्लक्ष. काही विक्रेते रस्त्याच्या मधोमध बसतात. त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न नित्याचाच.

  • बाजारपेठेतील काही शौचालये बंदस्थितीत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह बाजारात येणाऱ्यांची मोठी गैरसोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT