Fishing Season In Goa: मासेमारीच्या हंगामाला अजून गती नाहीच; कामगारांची कमतरता....

कुटबण जेटीवरील स्थिती : हंगामाला अजून गती नाहीच; लहान बोटीच समुद्रात
Fishing Season In Goa
Fishing Season In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Fishing Season In Goa: मासेमारीचा यंदा हंगाम सुरु होऊन 20 दिवस उलटले असले तरीही कित्येक ट्रॉलर्स अजून जेटीवरच उभे आहेत. कामगारांअभावी त्यांना मासळी पकडण्यासाठी समुद्रात जाता येत नसल्याचे कुटबण जेटीवरील ट्रॉलर्स मालकांनी सांगितले.

Fishing Season In Goa
Goa Fraud Case : पैसे उकळण्यासाठी ‘त्या’ डॉक्टरवर आरोप: आयएमए

यासंदर्भात, कुटबण मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विनय तारी म्हणाले, की यंदा कामगारांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अनेक बोटमालक चिंतेत आहेत. बोट मालकांनी पूर्ण तयारी केली असली तरी कामगार मिळत नसल्याने त्यांना समुद्रात बोटी नेता येत नाहीत. गोव्यातील बोट मालक हे पूर्णपणे परराज्यातील मजुरांवर अवलंबून आहेत. कामगार गोव्यात परतले तरच मासेमारी व्यवसायाला अधिक गती मिळेल. दरम्यान, ज्या लहान बोटी आहेत त्यांनी कमी मजुरांसह मच्छिमारी सुरु केली आहे.

अनेक कामगार कर्नाटकात; बोटमालक झारखंडमध्ये ः गेल्या वर्षी जेव्हा मासेमारीचा हंगाम संपला होता तेव्हा हे मजुर आपल्या गावी गेले होते. ते अजून परतलेले नाहीत. काही बोट मालक या कामगारांना महिन्याकाठी १३ ते १५ हजार रुपये देत होते. आता त्यांना कर्नाटकात रोजंदारीवर नव्हे, तर टक्केवारीप्रमाणे पैसे दिले जात आहेत. त्यामुळे कर्नाटकातील मजुर वर्ग गोव्यात परतलेला नाही, असे एका मासेमारी व्यावसायिकाने सांगितले. उल्लेखनिय म्हणजे, काही बोटमालक कामगारांच्या शोधात झारखंडमध्ये गेले आहेत.

Fishing Season In Goa
Goa News: राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी; संशयिताची अटकपूर्व जामिनासाठी धाव

दलालांकडून फसवणूक

कुटबण जेटीवर सध्या यांत्रिकी बोटी उभ्या आहेत. कामगार पाठवतो असे सांगून अनेक ट्रॉलर्समालकांना ते मिळालेले नाही. दलालांकडून फसवणूक झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या जेटीवरुन केवळ ५० टक्के बोटीच मच्छिमारीसाठी समुद्रात उतरल्याची माहिती कुटबण बोट मालक संघटनेचे माजी अध्यक्ष सिप्रियान कार्दोज यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com