Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market : म्हापसा मार्केट बुधवारी बंद ; आरटीआय कार्यकर्ता- विक्रेते वाद चिघळला

Mapusa Market : याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून समन्स आल्यामुळे मासळी विक्रेत्या महिलांनी शनिवारी (ता.६) सायंकाळी मार्केटमध्ये संताप व्यक्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Market :

म्हापसा, येथील मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्या तसेच एका आरटीआय कार्यकर्त्यामध्ये मध्यंतरी वाद झाला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली होती.

यासंदर्भात म्हापसा पोलिसांनी चॅप्टर केस बनवून याचा अहवाल बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असता, उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांना समन्स पाठवून सुनावणीस हजर राहण्यास सांगितले.

याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून समन्स आल्यामुळे मासळी विक्रेत्या महिलांनी शनिवारी (ता.६) सायंकाळी मार्केटमध्ये संताप व्यक्त केला. तसेच येत्या बुधवारी (ता.१०) मासळी मार्केट बंद ठेवून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

म्हापसा पालिकेने टाऊन वेंडिंग कमिटी स्थापन केली असून या आरटीआय कार्यकर्त्याने या कमिटीमार्फत ओळखपत्रे बनवून देतो, असे सांगून पैसे उकळल्याचा आरोप काही मासळी विक्रेत्यांनी केला होता. त्यातूनच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा-कर्नाटक सीमेवर मोठी कारवाई! काँक्रीट पंप मशीनमध्ये लपवलेली दारू केली जप्त; गुजरात येथील चालकाला अटक

Weekly Horoscope: सुवर्णसंधी चालून येणार, एप्रिलचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी खासच; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य

पुरुषांपेक्षा महिलांच्या पगारात होतेय जास्त वाढ! PLFS २०२५ च्या सर्व्हेतून बाब उघड; स्त्रीयांचे उत्पन्न एकूण तुलनेत कमी असल्याचाही दावा

VIDEO: फातोर्डा पोलीस स्टेशनच्या जवळच राजरोस जुगार सुरु; धक्कादायक व्हिडीओ समोर

मुंबई गोवा हायवेवर 'डिझेल' मिळेल का? सोशल मीडियावर पडला कमेंटचा पाऊस; पोस्ट टाकणाऱ्याने अनुभव लिहिला की, ' 80% पंपांवर.....'

SCROLL FOR NEXT