पणजी: लॉकडाऊनच्या काळात म्हापसा येथील काणका सर्कल परिसरात काही पुरुष सार्वजनिक ठिकाणी भांडत असल्याचे पोलिसांना दिसले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांशी गैरवर्तन केले, शिवीगाळ केली, धमक्याही दिल्या होत्या. तसेच पोलिस उपनिरीक्षक अनिल पोळेकर यांना ढकलल्याने ते जखमी झाले होते. याप्रकरणी पाच जणांविरोधात खटला चालवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांशी झालेल्या झटापटीच्या प्रकरणाला गांभिर्याने घेत म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश सुनावला आहे. आरोपींनी निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली.
१४ मे २०२० रोजी पोलिस गस्तीदरम्यान काणका सर्कल परिसरात काही पुरुष सार्वजनिक ठिकाणी भांडत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती बिघडली. आरोपींनी पोलिसांशी गैरवर्तन केले. पोलिस उपनिरीक्षकाला ढकलले. त्यांनी पोलिस जीपवर हातोडे मारले.
ही घटना गंभीर असून आरोपींविरोधात तातडीने तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, या टप्प्यावर पुरावे सिद्ध करणे हा हेतू नसून, केवळ प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे आढळते का, हे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे या पाच जणांविरुद्ध खटला सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.