Bengaluru Crime: ॲम्ब्युलन्स बनली 'काळ', तीन दुचाकींना चिरडले, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; बंगळुरुतील रिचमंड सर्कलवर थरार

Bengaluru Tragedy: बंगळुरुमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. येथे एका भरधाव ॲम्ब्युलन्सने तीन दुचाकींना चिरडले.
Crime News
Bengaluru Crime:Dainik Gomantak
Published on
Updated on

Bengaluru Tragedy: बंगळुरुमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथे एका भरधाव ॲम्ब्युलन्सने तीन दुचाकींना चिरडले. या अपघातात स्कूटरस्वार पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ॲम्ब्युलन्स चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

नेमके काय घडले?

शनिवारी (1 नोव्हेंबर) मध्यरात्री शहराच्या रिचमंड सर्कल (Richmond Circle) परिसरात हा अपघात झाला. एका भरधाव ॲम्ब्युलन्सने लाल सिग्नल तोडला आणि तिने अनेक दुचाकी वाहनांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, ॲम्ब्युलन्सने आधी तीन मोटारसायकलींना धडक दिली. त्यानंतर ती एका स्कूटरला काही मीटरपर्यंत फरफटत घेऊन गेली आणि शेवटी एका पोलीस चौकीला धडकून थांबली.

Crime News
Bengaluru Crime: धक्कादायक! बंगळूरुत ऑटो चालकाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून गुन्हा दाखल

पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, या भीषण अपघातात स्कूटरवर स्वार असलेले इस्माईल (वय 40) आणि त्यांची पत्नी समीना बानू यांचा जागीच मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरु असून त्यांची आरोग्य स्थिती काय आहे, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. गंभीर जखमी झालेल्या मृत पती-पत्नीला ॲम्ब्युलन्सच्या खालून बाहेर काढण्यासाठी परिसरातील लोकांनी ॲम्ब्युलन्स उचलण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातामुळे झालेल्या बाईक्सच्या नुकसानीची आणि पोलीस चौकीला बसलेल्या धडकेची भीषणता दिसत आहे.

Crime News
Bengaluru Crime: बंगळुरुतील फार्म हाऊसमध्ये सुरु होती ‘रेव्ह पार्टी’; CCB चा छापा, 5 जण गजाआड!

पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच विल्सन गार्डन वाहतूक पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताची पाहणी करुन गुन्हा (FIR) दाखल करुन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी ॲम्ब्युलन्स चालक अशोक याला त्वरित ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Bengaluru Stampede: बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण, RCBकडून मदत जाहीर; मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत देणार

स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण

बंगळुरुमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील लोक हैराण झाले आहेत. ॲम्ब्युलन्स चालकाने नियमांचे उल्लंघन करुन, वेगमर्यादेचे पालन करायला हवे होते, असे लोकांचे म्हणणे आहे. एका चालकाच्या चुकीमुळे निष्पाप जोडप्याला आपला जीव गमवावा लागला. चालकाने वेगावर नियंत्रण ठेवले असते, तर ही दुर्घटना टळली असती, पण नियम तोडल्याचा गंभीर परिणाम नागरिकांना भोगावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com