Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress on Mapusa: निष्क्रिय आमदारामुळे रखडला म्‍हापशाचा विकास

म्‍हापसा मतदारसंघात रस्‍त्‍यांबरोबरच वीज व वाहतूक कोंडीचीही समस्‍या आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress on Mapusa: आमदार ज्योशुआ डिसोझा यांचे आपल्‍या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालेले आहे. बाजूच्‍याच कळंगुट मतदारसंघातील रस्ते तेथील आमदाराने हॉटमिक्स डांबरीकरणाद्वारे गुळगुळीत करून घेतले आहेत.

म्हापशातील रस्‍ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्‍त केले नाहीत तर पावसाळ्‍यात वाहनचालकांना बराच मन:स्‍ताप सहन करावा लागेल, अशी भीती काँग्रेसचे उत्तर गोवा प्रवक्ते संजय बर्डे यांनी व्‍यक्त केली.

म्हापसा कार्व्हालो पेट्रोलपंपाजवळ जी दुकाने होती, ती पालिकेने पाडली. त्या दुकानदारांना जागा देतो म्हणून सांगितले होते. परंतु ती जागा देताना दुकानदारांना येथील दुसऱ्या मजल्यावर दुकाने दिली. त्‍यामुळे तेथे ग्राहक फिरकतही नाहीत. म्‍हणून या दुकानदारांचा त्‍यास विरोध असल्याचे बर्डे यांनी सांगितले.

म्‍हापसा मतदारसंघात रस्‍त्‍यांबरोबरच वीज व वाहतूक कोंडीचीही समस्‍या आहे. आमदार डिसोझा यांच्‍या वारंवार परदेशी दौऱ्यांमुळे त्‍यांचे आपल्‍या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले आहे. उपसभापती असूनही त्यांना विकासकामे करता येत नाहीत.

यावरून ते या मतदारसंघाचे निष्क्रिय आमदार असल्याचे स्‍पष्‍ट होते, अशी टीका बर्डे यांनी केली. यावेळी त्यांच्यासमावेत गजानन नाईक, भारत च्यारी, दत्ता घाडी, चंद्रकांत पेडणेकर, सिद्धेश मोरे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

SCROLL FOR NEXT