Rohan Khaunte: ‘संपर्क से समर्थन’ मार्फत वास्‍कोवासीयांशी संवाद

रोहन खंवटे : भाजपचे ‘संपर्क से समर्थन’; वास्‍कोवासीयांशी संवाद
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

Rohan Khaunte केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच सामान्यांच्या हितासाठी कार्य केले आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी हे सरकार कार्य करत आहे.

सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा नारा देऊन त्यासाठी केंद्र सरकारने शंभर टक्के झोकून दिले आहे. त्यामुळेच आज भारत विविध आघाड्यांवर नेत्रदीपक कामगिरी बजावत आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे महिनाभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्‍याअंतर्गत ‘संपर्क से समर्थन’ हा उपक्रम राज्‍यात ठिकठिकाणी सुरू आहे.

पर्यटनमंत्री खंवटे यांनी आज वास्कोतील नागरिकांशी संवाद साधून गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या कार्याची माहिती दिली.

Rohan Khaunte
Smart City: मलनिस्सारण काम ‘जी-सुडा’च्या अंगलट

यावेळी त्‍यांच्‍यासमवेत स्‍थानिक आमदार कृष्णा साळकर, वास्को भाजप मंडळ पदाधिकारी तसेच प्रभारी अनिता थोरात उपस्थित होत्या.

मंत्री खंवटे यांनी काही कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन त्‍यांच्‍याशी संवाद साधला. सर्वसामान्यांसाठी केंद्राने आखलेल्या योजनांची माहिती देतानाच केंद्रात मोदी सरकारची का गरज आहे, हे त्यांनी लोकांना पटवून दिले.

पाच लाख नामांकीत व्यक्तींशी साधणार संवाद

‘संपर्क से समर्थन’ योजनेखाली वेगवेगळ्या क्षेत्रांतील 5 लाख नामांकीत व्यक्तींशी संवाद साधण्याचे लक्ष्य राष्ट्रीय पातळीवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातून 140 कोटी जनतेपर्यंत मोदी सरकारच्या कार्याची माहिती पोचविण्याचा हेतू आहे.

या मान्‍यवरांमध्‍ये डॉक्टर, वकील, पद्म पुरस्कार विजेते, कलाकार आदींचा समावेश आहे. देशकल्याणासाठी मोदी सरकार ज्या पद्धतीने व गतीने काम करीत आहे, त्याचा उहापोह या मोहिमेतून घेण्‍यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com