Land Scam Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case : जमीन हडप प्रकरणात सुलेमानचा अटकपूर्व जामीन नामंजूर

तपास यंत्रणेला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Land Grabbing Case : तिसवाडी तालुक्यातील गवळी-मौळा येथील ‘कोतपोत’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुमारे पावणेदोन लाख चौ. मी. जमिनींचे बनावट दस्तावेज तयार करून त्याची विक्रीखत केल्याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी माडेल-थिवी येथील संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला म्हापसा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. तपास यंत्रणेला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

राफाईल लुईस जोझ लोबो यांनी वाळपई पोलिस स्थानकात संशयित सुलेमान खान व इतर चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या पाचजणांना कटकारस्थान रचून तिसवाडी तालुक्यात कुडका पंचायतीमधील सर्व्हे क्रमांक 36/0 मधील 1,09500 चौमी, सर्व्हे क्रमांक 37/0 मधील 38,325 चौमी तर सर्व्हे क्रमांक 38/1 मधील 38,250 चौमी जमीन बनावट दस्तावेज तयार करून ती वाळपई येथील उपनिबंधक कार्यालयात सादर केली होती. त्यानंतर बनावट दस्तावेज व सह्या करून या जमिनींची खतविक्री केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. राज्यातील जमीन हडपप्रकरणीचा तपास सध्या स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमार्फत सुरू आहे.

चौघांचा हात

1 वाळपई पोलिस स्थानकात नोंद असलेल्या ही तक्रार या एसआयटीकडे देण्याची शक्यता असल्याने अटक होण्याच्या भीतीने संशयित सुलेमान खान याने हा अर्ज सादर केला होता. न्यायालयातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी ही तक्रार सध्या वाळपई पोलिस स्थानकातच असल्याने त्याच्या अर्जाला विरोध केला होता.

2 या प्रकरणातील संशियतांचा शोध घेण्यात आला मात्र अजूनही सापडलेली नाहीत. संशयित सुलेमान खान याच्यासह इतर चारजण या जमीन हडप प्रकरणात गुंतलेले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सुलेमान खानला अटकपूर्व जामीन देऊ नये असा युक्तिवाद करण्‍यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT