Mapusa Dengue public awareness Dainik Gomantak
गोवा

Mapusa Dengue : म्हापशातील लोकप्रतिनिधींनी घेतला डेंग्यूचा धसका; पालिका क्षेत्रात जनजागृती

Mapusa Corporation : यासाठी त्यांनी एक पथक तयार केले असून सध्या खोर्ली येथील डोंगर भागातील प्रत्येक घरात जाऊन डेंग्यूच्या साथीविषयी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश, म्हापसा शहरात नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी डेंग्यूच्या साथीचा विषय गंभीरपणे घेतला आहे.

पालिका क्षेत्रात आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांच्या मदतीने गेल्या दोन दिवसांपासून नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर आणि सहकारी नगरसेवक, आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. दिनेश परब, डॉ. शिल्पा टोपले व इतरांसह घरोघरी जाऊन डेंग्यूविषयी जनजागृती करत आहेत.

यासाठी त्यांनी एक पथक तयार केले असून सध्या खोर्ली येथील डोंगर भागातील प्रत्येक घरात जाऊन डेंग्यूच्या साथीविषयी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

नागरिकांनी घरासभोवती स्वच्छता ठेवावी. घरात व आजूबाजूला प्लास्टिकची भांडी, पाण्याचे बॅरल, करवंट्या, टायर, माडाची चुडते अशा वस्तू न ठेवण्यासाठी बजावले. अशा ठिकाणी डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊन डेंग्यूची लागण होण्याची दाट शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

डॉ. दिनेश परब म्हणाले की, म्हापसा पालिका क्षेत्रामध्ये आमचे पथक घरोघरी जाऊन प्रत्येकाला डेंग्यूविषयी माहिती देत आहे.

वाहनांतून आणून टाकतात कचरा

म्हापसा शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. जे लोक उघड्यावर कचरा टाकतात, त्यांना जास्तीत जास्त दंड ठोठावण्यात येईल. लगतच्या पंचायत क्षेत्रातील काही लोक आपल्या हॉटेल, दुकानातील कचरा पिशवीत भरून गाडीमधून वेगवेगळ्या ठिकाणी टाकतात. अशा स्थितीत जर कोणी सापडल्यास त्यांची वाहने जप्त करण्यात येतील. तसेच संबंधितांवरही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांनी दिला.

पालिकेच्या २० ही प्रभागांमध्ये हे पथक दररोज प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जनजागृती करते. तेथील नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रत्येक व्यक्तीला घरासभोवती स्वच्छता ठेवणे, परिसरात टायर वगैरे वस्तू उघड्यावर ठेवू नये, तसेच डेंग्यूपासून कसे संरक्षण करावे, याची माहिती हे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी देत आहेत.

- डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्ष, म्हापसा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT