Mapusa constituency Dainik Gomantak
गोवा

Mapusa Bad Roads: ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ते?’ म्‍हापशात रस्‍त्‍यांना तळ्‍याचे स्‍वरूप; अर्धवट केबलिंगचा फटका

Mapusa road problem: पावसामुळे अनेक ठिकाणी माती वाहून गेली असून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीत मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश: म्हापसा मतदारसंघात भूमिगत वाहिन्‍यांच्‍या कामांसाठी रस्ते खोदले गेले; मात्र काम अर्धवट ठेवल्‍याने मोठी समस्‍या निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी माती वाहून गेली असून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीत मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

म्हापसाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण मतदारसंघातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत खड्डे बुजविण्याचेही काम झालेले नाही. त्यामुळे म्हापसा बाजारपेठेसह अनेक ठिकाणच्‍या रस्त्यांवर पाणी साचून त्‍यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेश चतुर्थीच्या काळात विक्रेत्यांना पाण्यात बसूनच व्यापार करावा लागला होता.

कामरखाजन, एकतानगर, खोर्ली, धुळेर, करासवाडा, पेडे-म्हापसा अशा भागातील रस्ते पावसामुळे पूर्णपणे उखडले आहेत. ठिकठिकाणी खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांना ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ते?’ असा प्रश्‍‍न पडू लागला आहे.

म्हापसा मासळी विक्रेत्यांनी मांडल्‍या पालिकेत समस्‍या

येथील मासळी बाजारातील विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने मासळी साफ करणाऱ्यांसोबत काल शुक्रवारी म्हापसा पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्‍या समस्‍या मांडल्‍या. या शिष्टमंडळाने म्हापशाचे आमदार ज्‍योशुआ डिसोझा यांचीही भेट घेतली, जे त्‍यावेळी पालिकेत उपस्थित होते.

चर्चेनंतर मासळी साफ करणाऱ्यांना मार्केट परिसरात स्वच्छता राखण्यास सांगण्यात आले. त्यांना पाण्याचे नळ कनेक्शन दिले जाईल. मात्र त्यांना बिल भरावे लागेल, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त... 4 दिवसांत 7,000 रुपयांची घसरण, 10 ग्रॅम 24 कॅरेटचा नवीन भाव जाणून घ्या

Donald Trump Dance: मलेशियात उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका! सोशल मीडियावर 'तो' भन्नाट डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का? VIDEO

Viral Video: विश्वास बसणार नाही! ट्रेनचं टॉयलेट झालं आलिशान 'प्रायव्हेट रूम'; पठ्ठ्याचा 'हा' व्हायरल व्हिडीओ पाहाच

Goa Rain: गोंयकरांना पाऊस सोडेना!! विजांचा कडकडाटासह जोरदार बरसणार, 29 ऑक्टोबरपर्यंत 'Yellow Alert'

"गोव्याकडून शिका", OLAच्या ढिसाळ कारभारावर कुणाल कामरा भडकला! 'विक्री थांबवा' मागणीला समर्थन; Post Viral

SCROLL FOR NEXT