Mapusa Police Quarters: 'पोलिसच झाले बेघर'! 50 वर्षांपूर्वीचे म्हापसा पोलिस क्वार्टर्स मोडकळीस, तात्काळ दुरुस्तीची होतेय मागणी

Police Staff Housing Issues: गेल्या ४० ते ५० वर्षांपूर्वी म्हापसा पोलिस स्थानकाच्या कर्मचारी वर्गासाठी तीन क्वॉटर्स बांधले होते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ते मोडकळीस आले आहेत.
Police Staff Housing Issues
Mapusa Police QuartersDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गेल्या ४० ते ५० वर्षांपूर्वी म्हापसा पोलिस स्थानकाच्या कर्मचारी वर्गासाठी तीन क्वॉटर्स बांधले होते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ते मोडकळीस आले आहेत. या तीन क्वॉटर्समध्ये पूर्वी सुमारे १६ कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय राहत होते; पण कालांतराने क्वॉटर्स हळूहळू मोडकळीस येऊ लागल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी ते क्वॉटर्स सोडले आणि आपल्या मूळ गावी जाऊन राहू लागल्याने त्यांना ड्युटीवर येण्यास बराच त्रास होत आहे.

ड्युटी संपवून घरी गेले तरी पोलिसांना अचानक म्हापशात काही झाल्यास पुन्हा बोलावले जाते. मात्र, ज्यांची घरे लांब असतात त्यांना पोलिस स्थानकात येण्यास वेळ लागतो. या पोलिस स्थानकात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वॉटर्स नसल्याने अत्यंत गैरसोय होते.

Police Staff Housing Issues
Mapusa: म्हापसा पालिका क्षेत्रातील बेवारस पाण्याच्या विहिरी विनावापर पडून, पालिकेचे दुर्लक्ष; उपाययोजना करण्याची मागणी

या पोलिस स्थानकात महिला पोलिस कर्मचारीही आहेत. त्याही लांबवरून येतात. त्यामुळे तातडीने बोलावल्यावर त्या महिला (Women) कर्मचाऱ्यांनाही पोलिस स्थानकात लगबगीने यावे लागते. त्यामुळे त्यांच्यातही नाराजी पसरलेली असते. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे की, पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांची नेमणूक घरापासून जवळच्या पोलिस स्थानकात करावी जेणेकरून आयत्यावेळी पोलिस स्थानकात काम पडल्या लवकर तेथे पोहोचता येईल.

Police Staff Housing Issues
Mapusa Theft: म्हापसा दरोडा प्रकरणी दोघा बांगलादेशींना अटक! कर्नाटकात आवळल्या मुसक्या; मुख्य सूत्रधार अजून मोकाट

त्वरित काम हाती घ्यावे!

सार्वजनिक बांधकाम खात्याने हे मोडकळीस आलेले आणि जीर्ण झालेले पोलिस (Police) क्वॉटर्स त्वरित मोडून नवीन बांधकाम सुरू करावे, तसेच ते सर्व सोयीसुविधांनी व्यवस्थित असावे, अशी मागणी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे. खरे म्हणजे ज्यावेळी हे सध्याचे पोलिस स्थानक बांधतेवेळी हे क्वॉटर्सही बांधले पाहिजे होते; पण ते काम केले नाही त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मत काहींनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com