Mapusa Communidade building Dainik Gomantak
गोवा

Mapusa Communidade building : म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक वारसा इमारत बनली कमकुवत; कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका

दुरुस्तीच्या प्रतीक्षेत : पाठपुरावा करूनही दुर्लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Communidade building : येथील शहरातील वारसा बांधकामात गणना होणारी कोमुनिदादची प्रशासक कार्यालयाची इमारत सध्या संततधार पावसामुळे मागील बाजूला थोडी खचल्याने तिला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या इमारतीची भिंत ही कमकुवत झाली असून एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी ती लवकर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

मागील काही दशकांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत तसेच पाठपुरावा केल्यावरही दुर्लक्ष होत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या जीर्ण इमारतीचे तातडीने नूतनीकरण करण्यात यावे. कारण, वेळेत जीर्णावस्थेतील इमारतीची दुरुस्ती न केल्यास येथील कर्मचाऱ्यांच्या जीवालाही धोका आहे.

म्हापसा कोर्ट जंक्शनवरील या प्रशासकीय इमारतीला अ‍ॅडमिनिस्ट्रीट ऑफ कोमुनिदाद दी बार्देश या नावानेही ओळखले जाते. या इमारतीला सध्या तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणाची आवश्यकता आहे. ही वास्तू केवळ प्रमुख खूणच नसून, तिला वारसा मूल्यही आहे. त्यामुळे त्याचे जतन करणे आवश्यक आहे. ही रचना जुनी पोर्तुगीज काळातील इमारत असून, ती १३०० चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेली आहे आणि त्यात अनेक खोल्या, एक गॅलरी तसेच सभागृहाचा यात समावेश आहे. या पोर्तुगीजकालीन इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते. तसेच छताचे सिमेंट खाली पडत असल्याने आतमधील लोखंडी सळ्याही बाहेर दिसत आहेत.

प्रशासकीय मंजुरी मिळूनही विलंब

१ या वासरा इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव अंदाजित तीन वर्षांपासून सरकारी लालफितीत अडकून आहे. २२ ऑक्टोबर २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून इमारतीच्या दुरुस्तीसाठी ५३ लाख ३१ हजार रुपयांना तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर २३ मार्च २०२१ रोजी ५७ लाख १७ हजार रुपयांना दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती.

२ त्यानंतर निविदा जीएसआर २०१९ अंतर्गत जारी केल्या होत्या. मात्र, संबंधित कंत्राटदाराने २०२३ वर्षाच्या जीएसआरअंतर्गत २७ टक्के ज्यादा रकमेत निविदा दाखल केल्या. त्यामुळे एकंदरीत प्रक्रिया रद्द करून जीएसआर २०२३ अंतर्गत नव्याने ५९ लाख ८९ हजार रुपयांचा दुरुस्तीसाठी खर्च निश्‍चित करून प्रशासकीय मंजुरीसाठी ५ मे २०२३ रोजी पाठवला होता; पण अद्यापही मंजुरी नाही.

३उत्तर गोव्याचे प्रशासकीय कार्यालय हे उसगावसह उत्तर गोव्यातील ७५ कोमुनिदाद हाताळत आहेत. अतिक्रमण व इतर कोमुनिदादसंदर्भात सरासरी सुमारे ५० ते ६० तक्रारी प्राप्त होतात. हे कामकाज हाताळण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने दैनंदिन कामकाजात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

SCROLL FOR NEXT