Goa Monsoon 2023 : पावसाचे अर्धशतक; ‘पॉवर प्ले’ सुरूच, 10 जुलैपर्यंत यलो अलर्ट

आतापर्यंत 50.6 इंच पावसाची बरसात : अनेक वृक्षांची पडझड होऊन नुकसान
Goa Monsoon
Goa MonsoonSandip Desai

Goa Monsoon 2023 : गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्यात दमदार खेळी करत ‘पॉवर प्ले’ कायम ठेवला असून आज शुक्रवारी त्याने इंचांचे अर्धशतकही पूर्ण केले. राज्यात अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरूच असून जनजीवन प्रभावित झाले आहे. घरांवर झाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत असून जीवितहानी नसली, तरी मालमत्तेची हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ७९.६ मि.मी म्हणजेच ३.१३ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत एकूण १,२७१.६ मि.मी (५०.६ इंच) पावसाची बरसात झाली आहे. खरे तर १५ दिवसांपूर्वी राज्यात ५० टक्के पावसाचा तुटवडा होता. तो भरून काढत अतिरिक्त ९.८ टक्के पावसाची बरसात झाल्याने राज्यासाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात १० जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

शुक्रवारी मयेत पाटो येथील एका घरावर एकाचवेळी सहा झाडे कोसळली. या घटनेत घराच्या छपरासह आतील साहित्याची मोडतोड झाली. या घटनेत सहदेव घाडी यांच्यासह त्यांच्या अन्य दोन भावांचे मिळून चार लाखांहून अधिक नुकसान झाले. या घटनेवेळी घरात आत कोणीच नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. सायंकाळी उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.

Goa Monsoon
Ravi Naik On Frog : बेडकांच्या मागे लागू नका; चिकन खा, बोकड खा, कृषिमंत्र्यांचा गोयकारांना सल्ला

कोेठे काय घडले?

बस्तोडा भागाला वादळाचा जबर तडाखा; लाखोेंची हानी.

सत्तरीत अनेक ठिकाणी झाडांची पडझडे; वीज खात्याचे नुकसान.

फोंडा तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड;घरांचे नुकसान.

मडगाव एसजीपीडीए मार्केट तिसऱ्या दिवशीही तुंबलेलेच.

आडपई येथे घरावर झाड कोसळून मोठी हानी.

नेरुल येथे आंब्याचे झाड पडून आठ दुचाकींसह २ कारची हानी

दिवसभरात २४ कॉल्स, ६ लाखांचे नुकसान, अग्निशमनचे जवान कार्यरत

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्यासह विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. शुक्रवारी अग्निशमन दलाकडे २४ घटनांची नोंद झाली. यात सुमारे ६ लाखांचे नुकसान झाले.

म्हापसा, पेडणे, फोंडा तसेच काणकोण या परिसरात झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या. सर्वाधिक ७ घटना फोंड्यात घडल्या. झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. ५ ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या.

९ ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली. ५ ठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान झाले, तर एका सरकारी इमारतीवर झाड पडल्याची नोंद आहे.

Goa Monsoon
Bachchu Kadu : पुन्हा गुवाहाटी करायला लावू नका; बच्चू कडूंचा भाजपाला नाव न घेता इशारा

वाळपई-साखळीत सरासरी घटली

राज्यात सरासरी पाऊस ५० इंच एवढा बरसला असला तरी वाळपई आणि साखळी परिसरात अजून पावसाने ४० इंचही गाठलेले नाहीत. वाळपईत तर आतापर्यंत केवळ २९.९९ इंच पाऊस पडला आहे.

एरव्ही सर्वाधिक पावसाच्या यादीत राहणाऱ्या सत्तरी तालुक्यात यंदा सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल साखळी येथे ३८.७४ इंच पाऊस पडला आहे. फोंडा येथे ४६.५८, तर पेडणे येथे ४७.२७ इंच पाऊस पडला. वाळपई, साखळी, फोंडा व पेडणे वगळल्यास राज्यातील इतर भागांत ५० इंचांहून अधिक पाऊस पडला.

धरणांतील पाणीसाठा

  1. साळावली : ४२ टक्के

  2. अंजुणे : ९ टक्के

  3. चापोली : ४८ टक्के

  4. आमठाणे : ५६ टक्के

  5. पंचवाडी : ४० टक्के

  6. गावणे : ५५ टक्के

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com