Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : फेरेरा-टिकलो यांच्यात रंगला ‘श्रेयवाद’ ; नेते आमने-सामने

Mapusa News : हळदोणा मार्केट संकुलाच्या पुनर्विकासावरून कुरघोडी

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्हापसा गेल्या दशकभरापासून जीर्ण अवस्थेत असलेल्या हळदोणा मार्केट संकुलाच्या पुनर्विकासाला सध्या सरकारकडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.

मात्र, या प्रकल्पावरून पुन्हा एकदा माजी आमदार टिकलो व विद्यमान आमदार फेरेरा यांच्यात श्रेयवादाच्या मुद्द्यावरून कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू झालेत. या प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी हे दोघेही नेते आमनेसामने आल्याने सध्या श्रेयवाद रंगला आहे.

यासंदर्भात शनिवारी (ता.३०) म्हापशात आयोजित पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांच्यावर शरसंधान साधले. मुळात आमदार फेरेरा हे खोटे बोलून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप टिकलो यांनी केला.

हल्लीच फेरेरा यांनी दावा केलेला की, आपल्यामुळेच सरकारकडून या प्रकल्पास तत्त्वतः मान्यता दिली. मात्र, टिकलोंच्या मते या प्रकल्पास त्यांच्या कार्यकाळातच मान्यता मिळाली होती.

ग्लेन टिकलो पुढे म्हणाले, आपल्या कार्यकाळातच हळदोणा मार्केटच्या पुनर्विकासाला तत्त्वतः मान्यता मिळालेली. फक्त हळदोणा पंचायतीकडून एनओसी मिळणे बाकी होती. मात्र, कोविड महामारी व त्यानंतर २०२२च्या विधानसभा निवडणुकीमुळे यामध्ये राजकारण आणले गेले व आम्हांला पंचायतीकडून एनओसी मिळाली नसल्याचा दावा टिकलो यांनी केला.

याविषयी टिकलोंनी आरटीआय कागदपत्रांचा आधार दिला. मात्र, कालांतराने अ‍ॅड. फेरेरा हे हळदोणेचे आमदार बनले व त्यांनी प्रकल्पाच्या फाईलवर स्वतःची नोट जायला हवी म्हणून या प्रकल्पास चालना देण्यास विलंब केला. या काळात मार्केट कोसळून मोठी दुर्घटना घडली असती तर याला अ‍ॅड. फेरेरा जबाबदार असते. स्वतःला मार्केटच्या पुनर्विकासाचे श्रेय व प्रसिद्धी मिळावे याकरिता फेरेरांनी गलिच्छ राजकारण खेळल्याचा आरोप टिकलोंनी केला.

सध्या हळदोणा मार्केट प्रकल्पाची स्थिती अत्यंत दयनीय बनली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे मार्केट सील करावे.

कारण दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात, या प्रकल्पास विलंब व्हावा व भाजपा सरकार तसेच आपल्या नावाची बदनामी व्हावी याकरिता अ‍ॅड. फेरेरा यांनी मागील दोन वर्षे प्रकल्प चालीस लावण्यास विलंब केल्याचा आरोप टिकलो यांनी केला. या पत्रकार परिषदेस झेडपी मनीषा नाईक, फ्रँकी कार्व्हालो, सुनील खडे, कार्ल डिसोझा, जॉर्ज डिसोझा हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वांची दिशाभूल!

आमदार कार्लुस फेरेरा तसेच काँग्रेसवर टीका करताना ग्लेन टिकलो म्हणाले की, अ‍ॅड. फेरेरा हे आजतागायत लोकांशी खोटे बोलून स्वतःच्या निष्पाप चेहऱ्याच्या आधारे ते सर्वांची दिशाभूल करीत आहेत.

काँग्रेस पक्ष हे बुडणारे जहाज असून अद्याप काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवार सापडत नाहीत. अशावेळी आमदार फेरेरा यांनी भाजपा सरकार व मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाला सांभाळावे, अशी बोचरी टीका त्यांनी फेरेरांवर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT