Goa Farmer: राज्यातील काजू उत्पादक हवालदिल

Goa Farmer: पिकात घट: पुढील पाड्यात उत्पन्नाची आशा
Goa Farmer
Goa FarmerDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Farmer:

राज्यातील एक महत्त्वाचे पीक म्हणजे काजू. देशविदेशांतील पर्यटक तसेच खवय्यांना गोव्याच्या काजूने भुरळ पाडली आहे. परंतु यंदा पहिल्या पाड्यात काजू उत्पादन योग्य आले नसल्याने तसेच काजू पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

काजू पीक आले नसल्याने त्याचा परिणाम त्याचा परिणाम फेणी आणि हुर्राकावर होत आहे. राज्यात मुबलक प्रमाणात बोंडू उपलब्ध नसल्याने अनेक व्यावसायिकांना शेजारील कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून बोंडू आणून हुर्राक फेणी तयार करावी लागत आहे. काजूचे उत्पादन हे हवामानावर देखील अवलंबून असते त्यामुळे जर हवामानातील आर्द्रतेत वाढ झाली तसेच दमट हवामान झाले तर त्याचा परिणाम मोहोरावर होतो.

Goa Farmer
Goa Accident Death: कारच्या धडकेने जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

परिणामी, काजू उत्पादन घटते. राज्यातील कच्चा काजूची बियांची किंमत १११ रुपये प्रती किलो आहे.लहान काजू उत्पादकांना शासन योग्य हमीभाव देईल. किमान २०० रुपये प्रती किलो अशी आशा आहे. राज्यातील अनेक कुटुंबांचा चरितार्थ या काजू पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातील काजू उत्पादक शेतकरी चिंतातुर आहे.

Goa Farmer
Goa Accident Death: कारच्या धडकेने जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

मोहरातील हंगामात राज्यातील काजू उत्पादन कमी झाले ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. हवामान बदलांचा परिणाम उत्पन्नावर होत असतो. परंतु अजून काजू उत्पन्नाचे २ पाडे बाकी आहे. सर्वसामान्यपणे काजूला तीन वेळा मोहर येतो. त्यामुळे येत्या काही दिवसात हवामान पिकासाठी सोयीस्कर राहिले तर पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते.

- नेव्हील आल्फोन्सो, कृषी संचालक

काही कलमी झाडांना पीक आहे. परंतु उत्पादन कमीच आहे. शेवटीशेवटी काजू उत्पादन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आशावादी असणे गरजेचे आहे.

- मिलिंद गाडगीळ.

यंदा काजूचे पीक कमीच आहे. तुलनेत अर्धेच आले आहे. बोंडू देखील कमीच आहेत. ही चिंतेची बाब आहे परंतु येत्या पुढील दोन महिन्यात पीक चांगले होऊ शकते.

- नरहरी हळदणकर..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com