Goa Bad Roads Dainik Gomantak
गोवा

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Mapusa Bad Roads: भूमिगत वीजवाहिन्यांसाठी म्हापसा मतदारसंघातील बरेच रस्ते खोदले होते. तेथे वाहिन्यांचे काम बरीच वर्षे सुरू आहे. हे काम अर्धवट राहिले असून रस्ता खोदलेल्या अवस्थेत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश : भूमिगत वीजवाहिन्यांसाठी म्हापसा मतदारसंघातील बरेच रस्ते खोदले होते. तेथे वाहिन्यांचे काम बरीच वर्षे सुरू आहे. हे काम अर्धवट राहिले असून रस्ता खोदलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्यांचे डांबरीकरण केले नसल्याने वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अक्षरश: कसरत करावी लागते. पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

या मतदारसंघातील रस्त्यांची पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणची माती वाहून गेल्यामुळे खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. अपघातांमुळे अनेक लोक जायबंदीही झाले आहेत. वाहनचालकांना या खड्डेमय रस्त्यांवरून वाहने चालविणे मुश्किल होत असल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

म्हापसा मतदारसंघाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी पावसाळ्यानंतर मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण त्या अगोदर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणार असल्याचे सांगितले होते.

पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे म्हापसा मतदारसंघातील रस्ते, मुख्यत: म्हापसा पालिका बाजारपेठेतील रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. गणेश चतुर्थीच्या काळात माटोळी आणि इतर साहित्य विक्रेत्यांना या पाण्यातच बसून माल विकावा लागला होता. हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी युवा कार्यकर्ते सिद्धेश मोरे आणि सचिन किटलेकर यांनी केली आहे.

म्हापसा मतदारसंघातील कामरखाजन, एकतानगर, खोर्ली, समतानगर, धुळेर, करासवाडा, पेडे म्हापसा व इतर ठिकाणचे रस्ते पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहेत. ज्याठिकाणी जे खड्डे पडले आहेत, त्या रस्त्यांवरून वाहने चालविताना चालकांना तारेवरची सर्कस करावी लागते. कामरखाजन, पेडे, एकतानगर व इतर काही ठिकाणचे रस्ते चिखलमय बनले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT