Mapusa District Hospital: धक्कादायक! सहा महिन्यांच्या बाळाला शौचालयात टाकून आई पसार; म्हापसा सरकारी रुग्णालयातील घटनेने खळबळ

Mapusa Hospital Newborn Abandoned: एका महिलेने प्रसूतीनंतर सहा महिन्यांचे मृत भ्रूण तिथेच टाकून पळ काढल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
Mapusa Hospital Newborn Abandoned
Mapusa District HospitalDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाच्या शौचालयात एका महिलेने प्रसूतीनंतर सहा महिन्यांचे मृत भ्रूण तिथेच टाकून पळ काढल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

ही घटना मंगळवारी (ता.३०) सकाळी १० ते १०.३०च्या दरम्यान उघडकीस आली. म्हापसा (Mapusa) जिल्हा इस्पितळामधील ओपीडीजवळील एका शौचालयात हे मृत भ्रूण सापडले. अकाली प्रसूती झाल्यानंतर भ्रूण बेवारस स्थितीत टाकल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

Mapusa Hospital Newborn Abandoned
Mapusa District Hospital: शवागारातील दोन केबिनना गळती; जिल्हा रुग्णालयात लोकांची गैरसोय

सूत्रांच्या माहितीनुसार, एका महिलेने शौचालयातच प्रसूतीनंतर बाळाला जन्म दिला. मात्र, याविषयी कोणालाही माहिती न देता ते भ्रूण तिथेच टाकून तिने पळ काढला. कालांतराने इस्पितळाच्या स्वच्छता कामगारांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. त्यानंतर लागलीच म्हापसा पोलिसांना (Police) पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून हे भ्रूण गोमेकॉत पाठविले.

Mapusa Hospital Newborn Abandoned
Margao District Hospital: जिल्हा इस्पितळात वाढती गर्दी! प्रशासनाचा जादा सुरक्षा रक्षकांसाठी प्रस्ताव

विशेष म्हणजे, घटनास्थळी नाळ वगैरे काहीच आढळले नाही. त्या महिलेने शौचालयामधून बाहेर पडतेवेळी कदाचित या शौचालयाची फरशी पाण्याने साफ केली असावी. स्वच्छता कामगारांना एका कोपऱ्यात फरशीवर भ्रूण निपचित पडलेले आढळले, असे सूत्रांनी सांगितले. डॉक्टरांनी पाहणी केली असता, पूर्ण वाढ न झालेले हे भ्रूण असल्याचे दिसून आले. अकाली प्रसूती झाल्यामुळे महिलेने ते भ्रूण तेथेच टाकले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणामुळे जिल्हा इस्पितळातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावेळी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण केले होते. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून इस्पितळ प्रशासनाची चौकशी केली. तसेच अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com