US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

Donald Trump Iran Military Action Threat: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या दारुण पराभवानंतरही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणबाबतचे आक्रमक आणि कठोर धोरण कायम असल्याचे दिसत आहे.
Donald Trump Iran Military Action Threat
Donald TrumpDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Donald Trump Iran Military Action Threat: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या दारुण पराभवानंतरही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणबाबतचे आक्रमक आणि कठोर धोरण कायम असल्याचे दिसत आहे. निवडणुकीतील पराभवाची पर्वा न करता ट्रम्प यांनी इराणविरुद्ध लष्करी कारवाईची शक्यता फेटाळलेली नाही.

ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी अत्यंत धमकीच्या सुरात स्पष्ट केले की, इराणवर हल्ला करण्याबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसला, तरी अमेरिकन सैन्य कोणत्याही संभाव्य लष्करी कारवाईसाठी पूर्णपणे सज्ज आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे आधीच तणावपूर्ण वातावरण असलेल्या मध्य पूर्वेत युद्धाची भीती अधिकच गडद झाली.

Donald Trump Iran Military Action Threat
Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

पुढे बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकन सैन्य सध्या पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने आधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करत आहे. जर इराणच्या प्रकरणात अमेरिकेला पुढे पाऊल टाकावे लागले, तर लष्कर सर्व दृष्टीने तयार आहे. इराणवर (Iran) लष्करी हल्ला करण्याचा पर्याय अद्याप बंद झालेला नसून तो ओपनच आहे, असे सांगत ट्रम्प यांनी इराणची अणुऊर्जा क्षमता अशा प्रकारे नष्ट करण्याचे संकेत दिले.

Donald Trump Iran Military Action Threat
Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

अमेरिकेकडे इराणची संपूर्ण लष्करी आणि अण्वस्त्र क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले. जर अमेरिकेने ही कठोर कारवाई केली, तर इराणला आपली लष्करी ताकद पुन्हा उभारण्यासाठी कमीत कमी 25 वर्षांचा कालावधी लागेल, असा दावाही त्यांनी केला. जरी इराणच्या इतर भागांची नासधूस करण्याची आपली इच्छा नसली, तरी परिस्थिती उद्भवल्यास अमेरिका मागे हटणार नाही, असे सांगत ट्रम्प यांनी इराणला थेट युद्धाचा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.