Mapusa Road  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: म्हापशात खड्डेच खड्डे, रस्त्यावर तळी, गटारे बेपत्ता!

Mapusa Municipal Council: पालिकेचे दुर्लक्ष असते किंवा कंत्राटदाराशी हातमिळविणी; प्रवीण आसोलकर यांचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधील रस्ते सध्या खड्डयात गेले आहेत, तर गटारे बेपत्ता झालीत, अशी स्थिती झालेली आहे. म्हापसा पालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याचा विभाग याला जबाबदार आहे. ते ज्या कंत्राटदाराला कामे देतात ते योग्य तऱ्हेने करतात की नाही याकडे त्यांचे एकतर दुर्लक्ष असते किंवा त्या कंत्राटदाराशी त्यांची हातमिळविणी असते, असा आरोप म्हापसा यूथ संघटनेचे अध्यक्ष प्रवीण आसोलकर यांनी केला.

प्रवीण आसोलकर म्हणाले की, म्हापसा पालिका क्षेत्रात २० प्रभाग आहेत, या सर्व प्रभागांमधील रस्ते व गटारांची हा सध्या दुरवस्था झालेली आहे. याकडे म्हापसा नगरपालिका व संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचा विभाग ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून येत आहे.

म्हापसा पालिका किंवा सार्वजनिक बांधकाम खाते ज्या कंत्राटदाराला कंत्राट देते त्यांच्याकडे प्राप्त माहितीनुसार दोन वर्षाचा करार करून घेतात, पण नंतर कामाची पडताळणी केली जात नाही.त्यामुळे या कंत्राटदारांकडून दोन्ही विभाग हात मिळवणी करत असावेत, असा संशय येतो,असाही दावा त्यांनी केला.

आज म्हापसा पालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांवर लहान मोठे खड्डे पडून सध्या सतत पडत असलेल्या पावसाचे पाणी त्यात तुंबलेले आहे. ठिकठिकाणी रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही आणि त्या खड्ड्यांत वाहने जाऊन आदळतात व मोडतोड होते.

लोकांनीच रस्त्यावर उतरावे!

सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था काम करत आहेत, त्या संस्था पुढे येऊन विविध विषयांवर आवाज उठवतात. त्यासाठी स्थानिकांनीही रस्त्यावर येणे आवश्यक आहे, आज रस्त्यावर पडलेले खड्डे गटारांची झालेली वाताहात पाहता नागरिकांनी व वाहन चालकांनीही रस्त्यावर येऊन संबंधित प्रशासनाचा निषेध करावा,असे प्रवीण आसोलकर यांनी आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT