Mapusa News: हा कचरा तर गावाबाहेरील लोकांचा! पंचायतीचे म्हणणे

Nachinola Panchayat: आमदार फेरेरा यांचा दावा पंचायत मंडळाने फेटाळला
Nachinola Panchayat: आमदार फेरेरा यांचा दावा पंचायत मंडळाने फेटाळला
Garbage Hotspot MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

नास्नोळा पंचायत क्षेत्रातील कचराप्रश्न सध्या चर्चेत आहे. आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी या समस्येला पंचायतीला जबाबदार धरल्यानंतर आता पंचायत मंडळाने आमदाराचा दावा खोडत हा कचरा गावातील लोकांचा नसून बाहेरचे लोक पंचायत क्षेत्रात कचरा आणून टाकत आहेत, असा दावा केला आहे. तसेच यावर नियंत्रण आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पुरवण्याची मागणी आमदाराकडे केली आहे.

नास्नोळा पंचायत क्षेत्रातील पॉवर स्टेशनसमोरील उतरणीवरील रस्त्याच्या शेजारी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. या मार्गाचा अवलंब करणाऱ्या गावाबाहेरील लोकांकडून हा कचरा टाकला जात असल्याचा पंचायत मंडळाचा दावा आहे. आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी या समस्येला तसेच व्यवस्थापनाबाबत जबाबदार धरले होते.

मात्र पंचायत मंडळाने आमदाराचा हा फेटाळला आहे. पंचायत मंडळाच्या म्हणण्यानुसार उघड्यावर कचरा फेकण्याच्या प्रकारास स्थानिक पंचायत दोषी नाही. कारण, या मार्गावरील वाहनचालकांकडून इथे कचरा फेकला जात आहे. पंचायत घरोघरी कचरा संकलन करते, त्यामुळे रस्त्यालगत उघड्यावर कचरा फेकणारे गावातील रहिवासी नसून शेजारील भागातील लोक आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी सरपंच फ्रेडी फर्नांडिस, पंच नीलेश केरकर, मारियो रॉड्रिग्स, ट्रेझा नाईक, सचिव रंजना राऊळ, माजी पंच कमलाकांत नाईक व सुदेश खलप उपस्थित होते.

सरपंच फ्रेडी फर्नांडिस यांनी सांगितले की, या रस्त्यालगत फेकला जाणारा कचऱ्याला पंचायत जबाबदार नाही. पंचायत क्षेत्राबाहेरील लोक जे या मार्गाचा अवलंब करतात, त्यांच्याकडून हा कचरा या ठिकाणी फेकला जातो. पंचायत तसेच पंचसदस्य वेळोवेळी स्वतःची पदरमोड करून येथील कचरा उकल करते. तरीही उघड्यावर कचरा टाकला जातो.

पंच नीलेश केरकर म्हणाले की, हा रस्त्यालगत कचरा फेकणारे स्थानिक गावकरी नसून गावाबाहेरील लोकच येथील परिसर अस्वच्छ करतात. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकांनी कचरा आपापल्या पंचायतीला सांगून विल्हेवाट लावावा, अशाप्रकारे दुसऱ्या पंचायत क्षेत्रातील रस्त्यालगत आणून टाकू नये.

Nachinola Panchayat: आमदार फेरेरा यांचा दावा पंचायत मंडळाने फेटाळला
Mapusa Municipal Council: म्हापसा पालिकेच्या तिजोरीत खडखडाट! विकासकामे थांबली

आमदाराने सीसीटीव्ही कॅमेरे द्यावेत

पंचायतीने स्थानिक आमदारांना पत्र लिहून पंचायतीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली आहे. जेणेकरून अशा उल्लंघनकर्त्यांवर चपराक बसवता येईल. पंचायत आर्थिकदृष्ट्या मजबूत नाही. परंतु आमदारांकडून आवश्यक प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. अशावेळी आमदारांनी पंचायतीला सहकार्य करून या ठिकाणी सीसीटीव्ही उभारणीसाठी मदत करावे, असे आवाहन सरपंच फ्रेडी फर्नांडिस यांनी केले.

Nachinola Panchayat: आमदार फेरेरा यांचा दावा पंचायत मंडळाने फेटाळला
Mapusa Bus Stand: म्हापसा बसस्थानकात थाटले चहाचे दुकान! चेअरमनना पत्ताही नाही

बाहेरच्या लोकांकडून अडथळे

नास्नोळा पंचायत गाव विकास समितीचे समन्वयक देविदास नेतार्डेकर म्हणाले की, पंचायतीने एमआरएफ शेड उभारणीचे काम चालीस लावले. परंतु या शेडच्या शेजारी मोठमोठे नवीन प्रकल्प येत आहेत. ही बांधकामे दिल्लीवाल्यांची असून त्यांनी न्यायालयात या शेडला हरकत घेतली आहे. हे प्रकल्प २०२३ पासून येथे उभे राहत आहेत तर २०१७ पासून पंचायतीची शेड बांधणीची प्रक्रिया सुरु आहे. बाहेरचे लोक येऊन अडथळे निर्माण करू लागल्यास ग्रामस्थांच्या हक्कांचे काय? सरकारने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com