Mapusa News Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : म्हापशात तंबाखूविरोधी कारवाई

‘कोटपा’अंतर्गत मोहीम : एकूण 1045 प्रकरणांची नोंद; 2.9 लाखांचा दंड वसूल

गोमन्तक डिजिटल टीम

कोटपा कायद्यानुसार (Cigarettes and Other Tobacco Products Act) तंबाखूविरोधी कारवाई करताना म्हापसा उपविभागाने चालू वर्षात कालपर्यंत एकूण १०४५ प्रकरणे नोंदवून तब्बल २ लाख ९ हजार रुपये दंड वसूल केला. याच कारवाईअंतर्गत बुधवारी म्हापसा, हणजूण व कोलवाळ पोलिसांनी तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली.

एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांनी सांगितले की, नामोशी-गिरी येथे म्हापसा पोलिसांनी कारवाई करीत समसुद्दीन जमिल शेख (२८, वेर्ला) यास अटक केली. त्याच्याकडून १० हजारांचा गुटखा व सिगरेट जप्त केले.

संशयित हा नामोशी येथे सरकारी प्राथमिक शाळेजवळ तंबाखू उत्पादनाची विक्री करीत होता, तर, हणजूण पोलिसांनी मूळच्या मध्य प्रदेशमधील संशयित इब्राहिम याच्याकडून ४० हजार रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला.

त्याचप्रमाणे, कोलवाळ पोलिसांनी कोटपाअंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून दोघांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित अरुण कुमार (रा. साई कॉलनी माडेल) व संशयित राम राज निसाद (उत्तर प्रदेश) यांना अटक केली. दोघांकडून ४३८० रुपयांचा मुद्देमाप जप्त केला. या सर्व संशयितांना अटक करून नंतर जामिनावर सोडले.

कदंब वाहतूक मंडळाचे आभार : साळकर

नोटचे (भारत) सचिव डॉ. शेखर साळकर यांनी म्हटले आहे की, तंबाखूविरोधी कार्यकर्ते, इतर संघटनांचा दबाव तसेच केटीसीचे अध्यक्ष व इतर अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर केटीसीच्या बसगाड्यांवर तंबाखूची जाहिरातबाजी केली जाणार नाही, असे आश्वासन मिळाले आहे.

हे पाऊल उचल्याबद्दल साळकर यांनी केटीसीचे चेअरमन, सरचिटणीसांचे आभार मानले. जिल्हाधिकार्‍यांनी राज्यातील तंबाखूच्या जाहिराती रद्द करण्याचे निर्देश जारी करावेत.

पणजीत मांडवी नदीच्या काठावर पानमसाल्याचे मोठे होर्डिंग लागलेत ते हटवावे, अशी मागणी साळकर यांनी केली.

धेंपे महाविद्यालयात जागृती

धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तंबाखू आणि अंमलीपदार्थांच्या व्यसनाविरोधात जागृती करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय तंबाखू निर्मुलन संघटनेचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर, प्राचार्य डॉ. वृंदा बोरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

तंबाखूविरुद्ध जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे. डॉ. साळकर यांनी विद्यार्थ्यांना भारतातील तंबाखू नियंत्रणाचे विविध पैलू आणि तंबाखूच्या सेवनामुळे होणारे आरोग्याचे विविध धोके याविषयी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

Goa Rain Alert: पावसाचे धूमशान! डिचोलीत रौद्रावतार, पोर्तुगीजकालीन पूल पाण्याखाली; पूरसदृश्य स्थिती

Ravichandran Ashwin: 'या' मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी अश्विनने घेतली IPL रिटायरमेंट? धक्कादायक खुलासा; बनणार पहिला भारतीय खेळाडू

Goa Live Updates: 24 तासांत 10 इंचापेक्षा अधिक पाऊस!

ऐन चतुर्थीत दुःखाचा डोंगर! गवत कापणीसाठी गेलेल्या भावांचा मृत्य, विजेच्या झटक्याने गमावला जीव

SCROLL FOR NEXT