Goa Nightlife Dainik Gomantak
गोवा

Goa Nightlife: नॉईज हॉटस्पॉटचे होणार मॅपिंग; नाईटलाईफवर बंधने येणार?

राज्यात प्रथमच अंमलबजावणी; प्रदुषण नियंत्रण मंडळाची निविदा 2.5 कोटी रूपयांची निविदा

Akshay Nirmale

Goa Noise Pollution Night Life:

गोवा देश-विदेशात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यासोबतच गोव्याच्या आणखी एका गोष्टीचे सर्वांना आकर्षण वाटते ते म्हणजे, येथील नाईटलाईफ. क्लब, पार्टी, उत्तररात्रीपर्यंत चालणाऱ्या म्युझिक पार्टी यासाठीही गोवा ओळखला जातो.

क्लब आणि पार्ट्यांमधील मोठ्या आवाजातील संगीत हे ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख स्त्रोत आहे. पण आता ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी या नाईटलाईफवर बंधने येण्याची शक्यता आहे.

ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (GSPCB) नॉईज मॅपिंग करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी सर्वाधिक आवाज असलेली काही ठिकाणे- हॉटस्पॉट्स निश्चित्त केले गेले आहेत. या हॉटस्पॉट्सवर हे मॅपिंग केले जाणार आहे.

दरम्यान, या कामासाठी एक निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार नॉईज मॅपिंगसाठी या क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असलेला सल्लागार नेमण्यात येणार आहे.

राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या या कामासाठी 2.5 कोटी खर्च अपेक्षित आहे. परवानगीयोग्य आणि पर्यावरणास अनुकूल आवाज पातळी ठेवणे, हे या मॅपिंगमागचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, या निविदासाठी फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख 8 मे असून, 10 मे रोजी बोली उघडली जाईल.

नॉइज मॅपिंगमधून संबंधित हॉट स्पॉटवरील रहदारीचे प्रमाण, वाहनांचा वेग, रस्त्यांचे तपशील, गाडीचे हॉर्न वाजवणे, इमारतींचे लेआउट, हवामानशास्त्रीय आणि स्थलाकृतिक असा डेटा याद्वारे गोळा केले जाईल. या मॅपिंगमुळे आवाज होणारे हॉटस्पॉट ओळखण्यास तसेच तिथे ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही त्याची मदत होईल.

निवडलेल्या साइट्ससाठी ध्वनी पातळी डेटामध्ये Lday, Lnight, Lmax, Lmin, L10, L50, L90, ट्रॅफिक नॉइज इंडेक्स आणि ध्वनी प्रदूषण पातळी यांसारखे वेगवेगळे ध्वनी निर्देशक समाविष्ट असतील.

सल्लागाराला हॉटस्पॉट्सवरील प्रदुषणाचे प्रमुख स्त्रोत, सभोवतालच्या दिवस आणि रात्रीच्या ध्वनी पातळीची श्रेणी आणि आवाजाच्या मानकांचे पालन यांचा सर्वसमावेशक अहवाल तयार करावा लागेल. त्यावरील उपाय आणि त्याचे परिणामदेखील सुचवावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "‘शंभर रुपये एका दिवसाचे; उद्याही पुन्हा पैसे द्यावे लागणार"

SCROLL FOR NEXT