Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Smart City Panjim: 'स्मार्ट सिटी' कामात घोळ सुरूच! रस्‍ते अचानक बंद; सांतिनेज, काकुलो जंक्शनवर वाहनचालकांची तारांबळ

Smart City Panjim: अनेकदा कामावेळी फुटणाऱ्या जलवाहिन्‍या किंवा मलनि:स्सारणच्‍या पाईप्‍समुळे कामाला उशीर होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City Panjim

पणजीतील ‘स्मार्ट सिटी’च्या कामांची पूर्तता करण्याची डेडलाईन येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही पूर्वकल्पना न देता काही रस्ते काल रात्रीपासूनच वाहतुकीसाठी अचानक बंद ठेवले गेल्याने वाहनचालकांना मन:स्‍ताप सहन करावा लागला. अनेकांना पर्यायी रस्ता शोधण्याची पाळी येत आहे.

अनेकांना या जंक्शनपर्यंत येऊन परत जावे लागत आहे. काकुलो मॉल जंक्शनवरील रस्ता आज (बुधवारी) सकाळपासून अचानक बंद करण्यात आला. त्यामुळे ताळगाव, सांतिनेज तसेच करंझाळे येथून या जंक्शनकडे येणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली.

गेले दोन महिने ताळगाव तसेच सांतिनेजकडे जाणारा रस्ता सांतिनेज जंक्शनवर बंद ठेवला गेला होता. ताळगावकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र सांतिनेज रस्ता सार्वजनिक बांधकाम कार्यालयापर्यंतच खुला केलेला आहे.

काकुलो मॉल जंक्शन वाहतुकीसाठी बंद करून तातडीने कामे सुरू केली आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न पणजी स्मार्ट सिटी विकास लि. कंपनीचा असला तरी सध्याची कामांची गती पाहता ते अशक्यप्राय असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षापासून हे स्मार्ट सिटीचे काम शहरात सुरू आहे मात्र हे काम संपता संपत नाही.

उच्च न्यायालयाची ३१ मे या डेडलाईनची टांगती तलवार आहे. काय उत्तर द्यायचे या विवंचनेने अधिकारी चक्रावून गेले आहेत.

सांतिनेज जंक्शन वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असले तरी हे जंक्शन ते ‘साबांखा’ कार्यालयापर्यंतच वाहने जाऊ शकतात. तेथे बॅरीकेडस् घालून रस्ता बंद करण्यात आला आहे. कांपाल येथून अग्निशमन दलाकडून या जंक्शनकडे येणारा रस्ता तसेच ताळगाव येथील तांबडी माती येथून कांपालकडे जाणारा रस्ताही वाहतुकीला बंद केला आहे.

त्यामुळे करंझाळेकडे जाणाऱ्या चालकांना ताळगाव किंवा कांपाल-मिरामारमार्गे जावे लागत आहे. या रस्त्यावर माती घालून तो सपाट करण्यात येत असला तरी तो किती दिवस बंद राहिल, याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे या परिसरातील लोकही चिंताग्रस्त आहेत.

दरदिवशी रात्री उशिरापर्यंत स्मार्ट सिटी कामाचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आढावा घेण्यात येत आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी रात्रंदिवस काम सुरू आहे. उच्च न्यायालयाला दिलेली ‘डेडलाईन’ पाळण्याचाही प्रयत्न होत आहे.

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा सर्व तो प्रयत्न आहे, असे नोडल अधिकारी संजीत रॉड्रिगीस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT