Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

MVA सरकारच्या काळात पुण्यातून उद्योग बाहेर गेले; शंकर जगतापांच्या प्रचारसभेत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची टीका

Pramod Sawant In Pune: काँग्रेसने ६० वर्ष कामगारांचा छळ केला, त्यांना विकास प्रवाहात सामिल करुन घेतले नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Pramod Yadav

पुणे: काँग्रेसने गेल्या ६० वर्षात कामगार वर्गाचा छळ केला तसेच त्यांना विकासाची समान संधी दिली नाही, अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. सावंत चिंचवड विधानसभा भाजप महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारसभेत बोलत होते. भाजपचे डबल इंजिन सरकार कामगारांच्या कल्याणासाठी काम करेल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.

चिंचवड विधानसभेसाठी भाजपने यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप यांना उमेवारी दिली आहे. जगताप यांच्या प्रचारासाठी वाल्हेकरवाडीत मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रमुख उपस्थित प्रचारसभा आयोजित केली होती.

यावेळी चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, गोरख धोत्रे, विलास सपकाळ यांच्यासह भाजप महायुते नेते आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

कामगार आणि उद्योजक संवाद आणि स्नेह मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने ६० वर्ष कामगारांचा छळ केला, त्यांना विकास प्रवाहात सामिल करुन घेतले नाही. तर भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवत असल्याचे सावंत म्हणाले.

लेबर कार्डमुळे कामागारांना घर, मुलांसाठी शिक्षण, आरोग्य यासारख्या सुविधा मिळवणे सुलभ झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कामारांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नाचे यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी कौतुक केले. तसेच, महायुती सरकारने पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात रस्ते, विमानतळ आणि लोहमार्ग तयार करण्यासाठी मोठे काम केल्याचे सावंत म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक उद्योग पुण्यातून बाहेर गेले. तर, महायुती सरकारच्या काळात राज्यात पुन्हा उद्योग आणि गुंतवणूक आणण्याचे काम झाले, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT