सांगे मतदारसंघात घरांची कठीण परिस्थिती Dainik Gomantak
गोवा

आणि ‘त्या’ मायलेकींसाठी धावून आली ‘सावित्री’

ही परिस्थिती सोशल मीडियावर नुकतीच अमित नाईक यांनी व्हायरल केल्यानंतर अनेकांचे पाय त्या झोपडीजवळ धावून आले.

दैनिक गोमन्तक

सांगे: सांगे (Sanguem) मतदारसंघात कठीण परिस्थितीचा सामना करणारी अनेक कुटुंबे (Family) आहेत. यातील काहीजण दुःख गिळून दिवस कंठीत असतात. विळियण भाटी सांगे येथील दुर्दैवी माय-लेकीचे हे कुटुंब असेच दिवस कंठीत आहे. दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते अमित नाईक (Amit Naik) यांनी या दुर्दैवी माय लेकींची करुण कहाणी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यानुसार काही लोकांनी आपल्या परीने मदत देण्यासाठी पुढाकार घेतला. समाजसेविका सावित्री कवळेकर (Savitri Kavlekar) यांनी माय लेकींची भेट घेत त्यांना कडधान्य व इतर मदत केली. तसेच जमिन उपलब्ध झाल्यास दोघींना घर बांधून देण्याचा शब्द दिला. (Many families in Sanguem in Goa are facing flood situation)

श्रीमती नाईक (46 वर्षे) आणि तिची मुलगी तेजा (32) असे दोघांचेच हे कुटुंब एकमेकांचाच आधार बनले आहे. तेजाला आधाराला बाप ही नाही आणि भाऊही नाही दोघांच्या जाण्याने दोघांच्या मनावर प्रचंड दडपण आल्याने त्यात हलाखिची परिस्थिती जगत असल्याने या दोन्ही मायलेक पार खचून गेली आहेत. सरकारच्या कोणत्याही योजना सवलती मिळत नाही, रोजंदारी करण्यासाठी अंगात ताकत नाहीत. त्यामुळे धुणी-भांडी करुन आठवड्याला तीनशे रुपये मिळतात. त्यावर दिवस ढकलावे लागतात. घर वजा झोपडी गावातील तरुणांनी बांधली तर त्यावर पत्रे रमाकांत नाईक यांनी दिले. चुडती वापरून भिंती केल्या, गॅस सिलिंडर दोन वर्षे भरला नाही. वीज नाही, नळ नाही, झोपण्यासाठी नीट जागा नाही, ओल्या जमिनीवर प्लास्टिक ताडपत्री त्यावर अंथरुण, खाण्याचे वांदे, शेजारी देईल तेव्हा खाईल अशी परिस्थिती त्यांची आहे.

ही परिस्थिती सोशल मीडियावर नुकतीच अमित नाईक यांनी व्हायरल केल्यानंतर अनेकांचे पाय त्या झोपडीजवळ धावून आले. अनेकांनी आपापल्या परीने मदत दिली. त्यात समाजसेविका सावित्री कवळेकर हिने त्यांची भेट घेऊन कडधान्य आणि गॅस सिलिंडर दिला. जमीन मालकांची भेट घेऊन झोपडीच्या ठिकाणी छोटेसे घर बांधून देण्यासाठी परवानगी मागितली. जमीन मालकांनी चार दिवसात याबाबत सांगतो असा शब्द दिला आहे. त्यांनी होकार दिल्यास घर बांधून देणार असल्याचे सावित्री कवळेकर हिने सांगितले आहे. आपल्याला अशी परिस्थिती पाहून वाईट वाटले असून शक्य तितक्या लवकर या माय-लेकींचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून शासकीय सवलती मिळवून देण्यासाठीही पुढाकार घेणार असल्याचेही कवळेकर यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT