गोव्याच्या Startup ची सातासमुद्रापार झेप

पणजीस्थित (Panaji) ''बीलाईव्ह'' (B-Live) हा भारतातील पहिला 'इलेक्ट्रॉनिक व्हेईकल एक्सपिरीयन्स आणि टुरिझम प्लॅटफॉर्म आहे
B-Live Startup from Panaji, Goa
B-Live Startup from Panaji, GoaTwitter/@sam_kholkar
Published on
Updated on

कोरोना महामारीच्या (COVID-19 pandemic) सावटाखाली अनेक व्यवसाय तसेच पर्यटन (Travel and tourism) क्षेत्र अडचणीत आलेले असताना गोमंतकीय स्टार्टअप (Startup) ''बीलाईव्ह''ने मात्र सातासमुद्रापार झेप घेण्यात यश मिळविले आहे.

ब्रिटनमधील ''ग्रीन क्रॉस युनायटेड किंगडम'' यांनी त्यांच्याशी सामंजस्य करार केला असून त्याअंतर्गत युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटनस्थळांवर इलेक्ट्रिक वाहनांच्या (E-vehicle) वापराला चालना मिळावी यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तसेच जगभरात निरंतर पर्यटनाला बळ देण्याच्या बाबतीत सल्लागार म्हणून ते काम पाहणार आहेत. पणजीस्थित (Panaji) ''बीलाईव्ह'' (B-Live) हा भारतातील पहिला ''इलेक्ट्रॉनिक व्हेईकल एक्सपिरीयन्स'' आणि ''टुरिझम प्लॅटफॉर्म'' आहे.

या स्टार्टअपची स्थापना संदीप मुखर्जी आणि मूळ काणकोणचे असलेल्या समर्थ खोलकर यांनी केलेली आहे. या संकल्पनेची नाविन्यता पाहून गोव्यातील उद्योगपती श्रीनिवास धेंपे आणि शिवानंद साळगावकर यांच्यासह उर्वरित भारतातील अन्य गुंतवणूकदारांनीही त्यात गुंतवणूक केलेली आहे.

B-Live Startup from Panaji, Goa
Goa Bhumiputra Bill: गोमंतकीयांना सांस्कृतिक अध:पतनाकडे नेणारा?

गोव्याच्या स्टार्टअप योजनेच्या अंतर्गत ''बीलाईव्ह'' नोंदणीकृत झालेले आहे. २०१८ सालच्या नोव्हेंबर महिन्यात स्थापन करण्यात आलेल्या या स्टार्टअपचे सध्या भारतातील नऊ राज्यांतील १५ शहरांमध्ये अस्तित्व आहे, अशी माहिती खोलकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता दिली. इलेक्ट्रिक सायकलवरून दौऱ्याची संकल्पना सुरू करणारी ''बीलाईव्ह'' ही देशातील पहिली कंपनी आहे. आतापर्यंत त्यांनी दहा हजाराहून अधिक ''ई-बाइक'' दौऱ्यांचे आयोजन केलेले आहे. आऊटडोअर अनुभवांच्या बाबतीत ''ट्रिप ॲडव्हायझर''ने त्यांना देशात पहिला क्रमांक दिलेला आहे, याकडे यावेळी खोलकर यांनी लक्ष वेधले.

गेल्या वर्षी कोरोनामुळे पर्यटन कोलमडून पडलेले असताना त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी ''बीलाईव्ह ईव्ही स्टोअर'' हा ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्म ‌सुरू केला. तेथून इलेक्ट्रिक स्कूटर आणि ''ई-सायकल''चे आघाडीचे ब्रँड विकले जातात. या प्लॅटफॉर्मला अल्पावधीत २५ राज्यांतून ग्राहक लाभले आहेत. आता सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पहिला ऑफलाईन स्टोअर सुरू करण्याचा संकल्प त्यांनी सोडलेला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com