Ponda  Dainik Gomantak
गोवा

Monsoon Update: पावसाच्‍या ट्रेलरनेच फोंडा जाम

नियोजनाचे तीनतेरा : वाहनचालक ‘खड्ड्यांत’; भविष्‍यातील चिंतेने लोक गर्भगळीत

गोमन्तक डिजिटल टीम

Monsoon Update जून महिन्‍याचा दुसरा आठवडा सरत आला तरी नियमित पाऊस अजूनही सुरू झालेला नाही. एकीकडे रखडलेल्या पावसाची चिंता तर दुसरीकडे रस्त्यांच्या दुर्दशेची चिंता, अशा दुहेरी कात्रीत सध्या फोंड्यातील लोक सापडले आहेत.

सध्या जो काही थोडाफार पाऊस पडतोय, त्यातून फोंड्यातील लोकांपुढे काय वाढून ठेवले आहे याचा ‘ट्रेलर’ स्पष्टपणे दिसू लागला आहे.

फोंडा शहरातील बरेच गटार साफ केले नसल्यामुळे नुकत्याच पडलेल्या पावसाने घरांमध्‍ये पाणी शिरले. पहिल्या पावसातच दादा वैद्य चौकात ‘तळे’ साचले. आता त्या पाण्‍याचा निचरा करण्‍यासाठी नगरपालिकेने तेथे खड्डा खोदून काम सुरू केले आहे.

पण मोठा पाऊस आला तर पुन्‍हा बाका प्रसंग उद्‌भवू शकतो. शहरातील खड्डे बुजविले असले तरी त्यांची माती रस्त्यावर पसरलेली आहे आणि पावसात त्याचा चिखल होऊन वाहतुकीला त्रासदायक ठरत आहे.

सध्या मडकई मतदारसंघात तर याचा जास्त प्रत्यय येत आहे. तेथे भूमिगत वीजवाहिन्‍यांसाठी केबल्स घालण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्‍यामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्‍वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्‍त्‍यांना पडलेल्‍या भेगा खडी टाकून बुजविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी पहिल्या पावसातच या तात्पुरत्या खडीचे पितळ उघडे पडले आहे.

वास्तविक काम संपल्यानंतर लगेच त्या रस्त्याचे डांबरीकरण होणे आवश्यक असते. पावसाचे आगमन लांबल्याची संधी घेऊन नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने गटार साफ करण्याचे, रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम त्वरित हाती घ्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दादा वैद्य चौकात नवे ‘बेट’ : पहिल्याच पावसात दादा वैद्य चौकात पाणी साचल्यामुळे आता नगरपालिकेने खड्डा खोदून त्यावर मलमपट्टी लावण्याचे काम सुरू केले आहे. हा रस्ता महत्त्वाचा असल्यामुळे तेथे नवीन निर्माण झालेल्या ‘बेटा’मुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे.

येथून जवळच जुने बसस्‍थानक असल्यामुळे या रस्त्यावरून बसेसची येजा कायम सुरूच असते. या बेटामुळे वाहतुकीत अडथळा तर निर्माण झाला आहेच, शिवाय मोठा पाऊस आला तर पुढे काय? हासुद्धा प्रश्‍‍न आहेच.

पावसाळा हा नियमित मौसम असूनही सज्जतेसाठी पूर्वतयारी केली जात नाही. त्यामुळेच मग अनेक समस्या उद्‌भवतात. वास्तविक हे नियोजन पावसाळ्यापूर्वी दोन महिने अगोदर व्हायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी याबाबतीत जागरूक नसल्यामुळेच लोकांना अनेक समस्‍यांना तोंड द्यावे लागतेय. - प्रशिल शेट पारकर, ग्रामस्‍थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT