Goa Shigmotsav 2023  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Shigmotsav 2023: डिचोलीतील शिगमोत्सवात चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्याचे आकर्षण; शुक्रवारी मिरवणूक

उत्कृष्ट चित्ररथाला 45 हजार रूपयांचे पहिले बक्षीस

दैनिक गोमन्तक डिजिटल

Bicholim Shigmotsav 2023: डिचोलीत यंदा येत्या शुक्रवारी (ता. 10) मार्च रोजी शासकीय पातळीवरील शिगमोत्सव साजरा करण्यात येणार असून, शिगमोत्सव साजरा करण्यासाठी आयोजन समिती सज्ज झाली आहे.

शिगमोत्सवानिमित्त चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेषभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

बोर्डे वडाकडून शिगमोत्सव मिरवणूकीला प्रारंभ होणार असून, भायली पेटमार्गे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाकडून कदंब बसस्थानकावर मिरवणुकीची सांगता होणार आहे. पत्रकार परिषदेत आयोजन समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी शिगमोत्सव मिरवणूक आणि कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.

शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता शिगमोत्सवाचे उद्घाटन होणार असून, प्रमुख पाहूणे म्हणून पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई, नगराध्यक्ष कुंदन फळारी, अनिकेत चणेकर आदी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

बोर्डे येथील श्री वडेश्वर देवाला नारळ ठेवल्यानंतर देवाच्या प्रांगणातून शिगमोत्सव मिरवणुकीला सुरवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पथकांनी शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत हजर राहणे बंधनकारक आहे.

चित्ररथ स्पर्धा-प्रथम- रोख 45 हजार रुपये, द्वितीय-30 हजार रुपये, तृतीय-25 हजार रुपये, चौथे-20 हजार रुपये, पाचवे-15 हजार रुपये आणि प्रत्येकी 5 हजार अशी 13 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

रोमटामेळ स्पर्धा-प्रथम- रोख 35 हजार रुपये, द्वितीय-20 हजार रुपये, तृतीय-15 हजार रुपये, चौथे-10 हजार रुपये, पाचवे-7 हजार रुपये आणि प्रत्येकी 4 हजार अशी 2 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

लोकनृत्य स्पर्धा-प्रथम- रोख 17 हजार रुपये, द्वितीय-12 हजार 500 रुपये, तृतीय-10 हजार रुपये, चौथे-8 हजार रुपये, पाचवे-5 हजार रुपये आणि प्रत्येकी 4 हजार अशी 10 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

याशिवाय राज्य पातळीवरील लहान व मोठा गट तसेच डिचोली मर्यादित लहान व मोठा गट वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT