Gomantak Impact: तब्बल 8 दिवसांनंतर अर्चना कुमारीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

उपजिल्हाधिकारी निपाणीकर यांनी दाखविलेल्या असंवेदशीलतेवर अनेकांची नाराजी
PostMortem
PostMortemDainik Gomantak

Gomantak Impact: आपल्याला वेळ नाही या एकाच सबबीवर 28 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केलेल्या अर्चना कुमारी हिच्या मृतदेहाचा इंक्वेस्ट पंचनामा करण्यास मुरगाव येथील तत्कालिन वादग्रस्त उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांनी 7 दिवस घालविल्याने शेवटी आज, मंगळवारी 8 व्या दिवशी त्या महिलेची शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

PostMortem
Govind Gaude: म्हापशातील रवींद्र भवन प्रकल्प कुचेलीत हलवणार

आज हे सोपस्कार पूर्ण झाल्यावर तिचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

दरम्यान उप जिल्हाधिकाऱ्याच्या या असंवेदशीलतेवर 'गोमंतक'ने उजेड पाडल्यावर सर्व थरातून संताप व्यक्त करण्यात येत असून मृत व्यक्तीकडेही आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भावनाकडे संवेदनशीलतेने न पाहणारा हा अधिकारी सेवेत राहणेही अयोग्य अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. वरिष्ठांनी त्यांच्या या कर्तुत्वाची दाखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली.

निपाणीकर यांनी पंचनामा करण्यासाठीं तीन वेगवेगळ्या तारखा देऊन या मृत महिलेच्या नातेवाईकांना खोळंबून ठेवले होते. त्यांच्या या कृती बद्दल त्यांना विचारले असता. 'आम्हाला आणखीही कामे असतात,' असे उद्धट उत्तर त्यांनी दिले होते.

'गोमंतक'ने काल त्यांना या गोष्टी बद्दल विचारण्यासाठी फोन केला असता मी आता वास्कोचा कारभार पाहत नाही, असे सांगून फोन बंद केला होता.

PostMortem
Goa Illegal Constructions: गोव्यातील महामार्गालगतच्या अवैध बांधकामांवर होणार कारवाई

अर्चना कुमारी हिच्या कुटुंबीयांनीही 'गोमंतक'चे आभार मानले. महीला अधिकारासाठी वावरणाऱ्या आवडा विएगस यांनी या घटनेचा निषेध करताना महिलांच्या मृतदेहाची अवहेलना करणारा अधिकारी अशा जबाबदार पदावर बसण्यास अयोग्य असून त्यांच्या या कृतीची वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई करण्याची गरज व्यक्त केली.

जर निपाणीकर हे कामात व्यस्त होते तर हे सोपस्कार पूर्ण करण्यासाठीं आणखी दुसऱ्या वेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे शक्य होते असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com