Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: सत्तरी कुणाच्या बापाची नाही; मनोज परब यांचे टीकास्त्र

पदयात्रा पूर्ण करण्याचा निर्धार

दैनिक गोमंतक

Manoj Parab: सत्तरी तालुक्यात वाळपई, पर्ये मतदारसंघांत मिळून विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ने दहा हजार मते घेतली होती. त्यामुळे म्हादईसारखी समस्या निर्माण होते, त्यावेळी त्या लोकांना पाठिंबा देण्याची पक्षाची नैतिक जबाबदारी असते.

म्हणूनच ठाणे येथून पदयात्रा सुरू केली होती. पण याला राजकीय वळण देत काहींनी पदयात्रा रोखली. पण आम्ही मागे हटणार नाही. सत्तरी तालुका कुणाच्या बापाचा नाही, असे रोखठोक प्रतिपादन मनोज परब यांनी केले.

वाळपई येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीनंतर परब बोलत होते. ते म्हणाले, पदयात्रा काढण्यात पंचायतींचा काहीही संबंध नसतो. आज उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर आमच्या वकिलांनी बाजू मांडताना काही घटनांचा उल्लेख करून जजमेंट सादर केले.

त्यात रामलीला, कर्नाटक सरकार, मेनका गांधी अशा काही जजमेंटचा समावेश होता. हे आमचे आंदोलन नव्हे, तर जनजागृती कार्यक्रम आहे. पदयात्रा हा आमचा हक्क आहे, असेही ते म्हणाले.

प्रसंगी न्यायालयात धाव घेऊ

काहीही झाले तरी पदयात्रेच्या परवानगीचे पत्र हाती घेऊन पोलिसांच्या साक्षीने सत्तरीत 100 किलोमीटरची पदयात्रा काढणारच, असे परब म्हणाले. शासनाने परवानगी दिली नाही तरी प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली जाईल.

मागील एका प्रकरणात आमचा विजय होऊन सरकारला चपराक बसली होती. आता ही दुसरी चपराक सत्तरीच्या बाबांना बसणार आहे, असेही परब म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT