Goa Government Manohar Parrikar Yuva Scientist Award 2024
पणजी: गोवा सरकारच्या वतीने दिला जाणारा मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या डॉ. मोहितकुमार जॉली यांना जाहीर झाला आहे.
बंगळुरुच्या आयआयएसी संस्थेत डॉ. जॉली कॅन्सर उपचारावर संशोधन करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.
मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. देशातील युवा वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
२०२४ वर्षासाठी देशातून ८२ अर्ज प्राप्त झाले होते. यातून १२ जणांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते.
डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने केलेल्या छाननीनंतर डॉ. जॉली यांची निवड करण्यात आली आहे.
युवा वैज्ञानिकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी गोवा सरकारने गेल्या वर्षी या पुरस्काराची सुरुवात केली. यावर्षी या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. रुपये पाच लाख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
येत्या १३ डिसेंबर २०२४ रोजी मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात या पुरस्काराचे वितरण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी एका पोस्टद्वारे दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.