Damodar Naik And SADANAND SHET TANAVADE Dainik Gomantak
गोवा

Mann Ki Baat@100 : 100व्‍या ‘मन की बात’चे राज्यभर प्रक्षेपण : सदानंद शेट तानावडे

गुजरात आणि महाराष्ट्रदिन कार्यक्रमाचेही आयोजन

दैनिक गोमन्तक डिजिटल

येत्या रविवार 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 100वा ‘मन की बात’ कार्यक्रम होत आहे. या शतकमहोत्‍सवी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील सर्व मतदारसंघांत करण्‍यात येणार असल्‍याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते.

तानावडे म्हणाले की, येत्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्‍या थेट प्रक्षेपणासह ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचा भाग म्हणून पणजीतील सम्राट थिएटर सभागृहात महाराष्ट्र आणि गुजरातदिन साजरा करण्यात येणार आहे.

राज्यात एकूण 1722 बूथ आहेत. पैकी 1250 बूथवर ‘मन की बात’चे प्रक्षेपण करण्यात येईल. या कार्यक्रमाला पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकही उपस्थित असतील.

पक्षाचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, नेते आणि पदाधिकारीही उपस्‍थित असणार आहे. खासदार विनय तेंडुलकर फोंडा येथे तर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक पर्वरी येथील कार्यक्रमास हजर असतील. पणजीतील मुख्यालयातही हा कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे तानावडे म्हणाले.

राजकारणविरहित कार्यक्रमाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाची सूत्रे हाती घेताच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासीयांशी संवाद साधण्याकरिता ‘मन की बात’ या कार्यक्रमास सुरूवात केली. या कार्यक्रमात कोणतीही राजकीय भूमिका मांडली जात नाही किंवा या व्यासपीठाचा राजकारणासाठी वापर केला जात नाही.

देशाच्या कानाकोपऱ्यांत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या कार्याची माहिती खुद्द पंतप्रधान देशातील नागरिकांना देतात. त्‍यांनी यापूर्वी गोव्यातील दिव्यांगासाठी केलेल्या पर्पल महोत्सवाचा उल्लेख केला होता. तसेच रांगोळी कलाकार दत्तगुरु वांतेकर यांचाही उल्लेख केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT