Goa Congress : पंतप्रधानांनी ‘गोवा की बात’ करावी : काँग्रेस

म्‍हादईच्‍या विषयावर स्‍पष्‍ट मत मांडणे आवश्‍‍यक
Goa Government | Amarnath Panajikar
Goa Government | Amarnath PanajikarDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी आपला शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रम करणार आहेत. आता तरी मोदींनी या कार्यक्रमात ‘गोवा की बात’ म्हणजेच म्हादई वळविण्याच्या विषयावर मत मांडावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाने केले आहे.

गोवा काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्हटले आहे की, आता गोमंतकीयांच्‍या आशा केवळ पंतप्रधानांवरच आहेत. तेच किमान धैर्य दाखवू शकतात आणि म्हादई वळविली जाणार नाही हे सांगू शकतात.

‘मन की बात’च्या माध्यमातून मोदींनी राज्य सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांचे कौतुक केले, अशा फुशारक्‍या गोव्यातील भाजप नेते मारत असतात. आता या नेत्यांनी पंतप्रधांनांना सांगण्याची हिंमत दाखवावी आणि म्हादईच्या विषयावर बोलण्यास भाग पाडावे. तसेच या माध्यमातून भाजपने गोव्यासारख्या छोट्या राज्यावर आपले प्रेम दाखवावे, असे पणजीकर यांनी नमूद केले आहे.

Goa Government | Amarnath Panajikar
Churchill Alemao : सार्दिन, सरदेसाई यांनीच भाजपला राज्‍यात सत्तेवर आणले : आलेमाव

अमित शहा धाडस दाखविण्‍यात पडले कमी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गोमंतकीयांसमोर म्हादईच्या मुद्द्यावर सत्य बोलण्याची हिंमत दाखवण्यात व खरे बोलण्याचे धाडस दाखवण्यात अपयशी ठरले. आता त्यांनी पंतप्रधानांना सांगून म्हादईच्या प्रश्नावर बोलायला सांगावे. शहांच्‍या वक्तव्‍यावर भाजप नेत्यांनी अजूनपर्यंत स्पष्टीकरण दिलेले नाही, याकडे अमरनाथ पणजीकर यांनी लक्ष वेधले.

"म्हादईप्रश्‍‍नी विचार मांडण्यासाठी भाजपला ‘मन की बात’चे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे कर्नाटक आणि गोव्याबरोबरच इतर सर्व राज्यांना भाजपचे लहान राज्यांबद्दलचे प्रेम कळेल. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी कर्नाटकात बोलायचे विसरून जावे. निदान गोव्‍यात तरी म्‍हादईप्रश्‍‍नी ठोस विधान करावे."

अमरनाथ पणजीकर, गोवा काँग्रेस मीडिया विभाग अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com