manish sisodiya Dainik Gomantak
गोवा

‘आप’व्यतिरिक्त इतरांना दिलेले मत भाजपलाच: सिसोदिया

कौशल्य विकास केंद्रांसोबतच नुवेमध्ये शेतकरी बाजार स्थापन करण्याची त्यांची योजना..

दैनिक गोमन्तक

पणजी: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारी शिरोडा, कुंभारजुवे, कुठ्ठाळी, नुवे आणि बाणावली येथे झालेल्या सभांमध्ये संरक्षण, प्रगती आणि समृद्धी या तीन लोकाभिमुख मुद्यांवर केंद्रित आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. ‘आप’व्यतिरिक्त इतर पक्षांना दिलेले मत हे भाजपलाच जाईल. त्यामुळे ‘आप’ला मत द्या, असे आवाहन सिसोदिया यांनी केले.

सिसोदिया यांनी स्पष्ट केले, की समृद्ध संस्कृती आणि वारसा जतन करण्यासाठी, सार्वजनिक सुविधांच्या विकासाद्वारे प्रगती, शहराच्या पायाभूत सुविधा आणि सुविधा

आणि सुधारित प्रशासन आणि सर्वांगीण विकासाद्वारे प्रत्येक व्यक्तीची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आप वचनबद्ध आहे. (manish sisodiya appealed to people to vote for goa aap only)

पक्षाची सत्ता आल्यास शिरोडावासीयांचा बेरोजगारीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे ‘आप’चे शिरोडा येथील उमेदवार महादेव नाईक यांनी सांगितले. आमच्या योजनेत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात अनेक नोकऱ्या निर्माण करणे समाविष्ट आहे. स्थानिकांसाठी 80 टक्के नोकऱ्या राखून ठेवू आणि बेरोजगारांना रोजगार मिळेपर्यंत त्यांना 3 हजार रुपये मासिक बेरोजगारी भत्ता देण्याची हमी देऊ’, असे ते म्हणाले.

कुंभारजुवेमध्ये (Cumbarjua) ‘आप’चे उमेदवार गोरखनाथ केरकर यांनी कुंभारजुवे मतदारसंघातील पाण्याची समस्या सोडवण्याचे आणि मतदारसंघासाठी योग्य कचरा संकलन यंत्रणा उभारण्याचे आश्वासन दिले. शिवाय त्यांनी अखंडित वीजपुरवठा आणि कुंभारजुवेमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे आश्वासन दिले.

‘आप’ (Goa AAP) कुठ्ठाळीच्या उमेदवार एलिना साल्ढाणा यांनी मोले जैवविविधता खेत्रातून पार करणारे तीन रेखीय प्रकल्प रद्द करण्याचे आणि ट्रॉलर फिशिंग, एलईडी फिशिंग आणि बुल ट्रॉलिंगवर पाच किमी त्रिज्येवरील बंदी आणि सीआरझेड झोनमध्ये कोणतेही बांधकाम क्रियाकलाप न करण्याचे आश्वासन दिले आहे. कुठ्ठाळी, कासावली आणि सांकवाळ येथे आरोग्य सेवा सुविधा तसेच मतदारसंघातील जलसाठे संवर्धन करण्याचे आश्वासन दिले.

नुवेमध्ये प्रयोगशाळा

नुवेमध्ये (Nuvem), आप उमेदवार डॉ. मारियानो गुदिन्हो यांनी गोव्यातील पारंपरिक बेकर्स, शॅकमालक आणि पाडेलींना संरक्षण देणाऱ्या विशेष धोरणाचे वचन दिले आहे. फॉर्मेलिनच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याची त्यांची योजना आहे आणि साळ नदीला पुनरुज्जीवन मिळवून देण्याचे त्यांचे ध्येय आहे. मतदारसंघातील सर्व पंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रांसोबतच नुवेमध्ये शेतकरी बाजार स्थापन करण्याची त्यांची योजना आहे जेणेकरून शेतकरी त्यांचा माल थेट ग्राहकांना विकू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT