Manish Sisodia Dainik Gomantak
गोवा

मनीष सिसोदियांनी गोव्यातील चार मतदारसंघात केल्या 'या' घोषणा

व्यावसायिक परीक्षांसाठी प्रत्येक गावात कोचिंग सेंटर्स स्थापन करण्याचा आपचा मानस तसेच..

दैनिक गोमन्तक

पणजी : जतन, प्रगती आणि समृद्धी या तीन लोकाभिमुक मुद्यांवरील आप च्या घोषणापत्राचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या हस्ते शनिवारी अनावरण केले. यावेळी सिसोदिया यांनी स्पष्ट केले की समृद्ध संस्कृती आणि वारसा जतन करण्यासाठी, सार्वजनिक सुविधांच्या विकासाद्वारे प्रगती, शहराच्या पायाभूत सुविधा, सुधारित प्रशासन आणि सर्वांगीण विकासाद्वारे प्रत्येक व्यक्तीची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आप वचनबद्ध आहे.

चुनी-रिवोणा , कोरला-काझूर, दावरे-नेत्रावळी , पत्रे-भाटी, धारणी-उगे, पेडामोळ -रिवोण, पोलतादिन-मालकर्णे आणि सालगीनी रस्ते तीन वर्षांत बांधले जातील, असे आश्वासन आपचे उमेदवार अभिजीत देसाई यांनी सांगेकरांना दिले.

शिवाय, आप ने आश्वासन दिले आहे की कच्च्या काजूसाठी जास्तीत जास्त दर रु. 200 प्रति किलो, दर वार्षिक पाच टक्क्यांनी वाढेल आणि नेत्रावळी किंवा वड्डे मध्ये काजू प्रक्रिया युनिट स्थापन केले जाईल.

नावेली मध्ये, आप (AAP) उमेदवार प्रतिमा कुतीन्हो यांनी सायपे तलावाचे सुशोभीकरण आणि स्वच्छता करण्याचे वचन दिले आणि रोझरी चर्च नावेली जवळील मुख्य रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी डोंगोरि रोड आणि रावनफोंड रोडला जोडणारा रस्ता तयार करण्याचे वचन दिले.

याशिवाय, आप ने नावेली (Navelim) येथे जागतिक दर्जाचे शेतकरी संशोधन केंद्र आणि रुमदामोळ येथे नवीन आणि सुधारीत आरोग्य सुविधा बांधण्याचे आश्वासन दिले आहे. कुतीन्हो यांनी झोरीवाड्डो येथे उच्च माध्यमिक शाळा बांधण्याचे आश्वासन दिले. कुंकळीचे उमेदवार प्रशांत नाईक म्हणतात की त्यांची मकासाना, गुइर्डोलि, चांदोर, अम्बौली आणि पारोडा येथे मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा स्थापन करण्याची योजना आहे. त्याना कुंकळीमध्ये सर्व वैद्यकीय सुविधांसह 50 खाटांचे आरोग्य केंद्रही स्थापन करायचे आहे.

शिवाय, ते म्हणाले की मकासाना येथे सहा महिन्यांत नागरी पुरवठा सोसायटी सुरू केली जाईल, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मूलभूत स्वच्छता सुविधा अपग्रेड केल्या जातील. चांदोर आणि गुरडोलि ला कोळसा केंद्राचा भाग होण्यापासून रोखण्याची शपथही त्यांनी घेतली.

आप वेळीचे उमेदवार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले की ते साळ नदीकाठी जैवविविधता आणि स्थानिक व्यवसायांचे संरक्षण करतील. NEET, NET, UPSC, GPSC, CAT, इत्यादी व्यावसायिक परीक्षांसाठी प्रत्येक गावात कोचिंग सेंटर्स स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे.

मतदारसंघातील बेरोजगारीची (Unemployment) समस्या दूर करण्यासाठी वेळीमध्ये उद्योजकता आणि रोजगाराभिमुख केंद्रे स्थापन करण्याची त्यांची योजना आहे. नागरिकांना इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावात मोफत आणि जलद वाय-फाय नेटवर्क तयार करण्याची त्यांची योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT