Goa Unity Mall:  Dainik
गोवा

Goa Unity Mall: ‘युनिटी मॉल’मुळे खारफुटी धोक्‍यात !

‘एनजीटी’कडे धाव, विजय सरदेसाईंचा इशारा

दैनिक गोमन्तक

Goa Unity Mall: मेरशी येथे येऊ घातलेल्‍या ‘युनिटी मॉल’ या प्रकल्‍पामुळे या भागातील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होणार असून या प्रकल्‍पामुळे तब्‍बल 70 हजार चौ.मी. खारफुटीचे रान धोक्‍यात येणार आहे. त्‍याशिवाय २५ हजार चौ.मी. भात शेतीचीही जमीनही नष्‍ट होणार याकडे गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे.

हे पर्यावरणाचे धोके लक्षात घेऊन सरकारने या प्रकल्‍पाची जागा न बदलल्यास राष्‍ट्रीय हरित लवादा (एनजीटी) कडे जाण्‍याशिवाय पर्याय नसेल,असा इशाराही त्यांनी दिला. ग्रामीण विकास यंत्रणेच्‍या अखत्‍यारित असलेली मेरशीतील ही जमीन पर्यटन खात्‍याला हा प्रकल्‍प विकसित करण्‍यासाठी देण्‍याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत झाला असून या पार्श्‍वभूमीवर सरदेसाई यांनी ही भीती व्‍यक्‍त केली आहे.

या प्रकल्‍पामुळे सरकारला आर्थिक फायदा दिसत असला तरी पर्यावरणाची हानी त्‍यापेक्षा जास्‍त आहे, अशी भीती त्‍यांनी व्‍यक्‍त केली. ज्‍या जागेत हा प्रकल्‍प येऊ घातला आहे तो सखल भातशेतीचा भाग आहे. समुद्रसपाटीपासून ५ मीटरच्या उंचीवर असलेले हे क्षेत्र पुराच्यावेळी बफर झोन म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यामुळे या भागातील लोकांचे हे क्षेत्र पूर येण्यापासून संरक्षण करू शकते.

..तर पणजीत पूर!

या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम आल्‍यास ते या भागासाठीच नव्‍हे, तर पणजीतही पूरस्‍थिती उद्‌भवू शकते. याची दखल घेऊन सरकारने हा प्रकल्‍प रद्द करावा, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली आहे. २ वर्षांत या भागात खारफुटी मोठ्या प्रमाणावर नष्‍ट केली आहे,याकडे लक्ष वेधले. खारफुटीचा नाश हा पर्यावरणाचा विध्वंसच असेही त्यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT