Goa Politics: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समाजकल्याण आणि महिला, बाल खात्याच्या विविध लाभार्थ्यांना प्रलंबित आर्थिक साहाय्य वाटपासाठी 300 कोटींच्या वाटपाचा मंजुरी आदेश सार्वजनिक करतील करावा. मला मिळालेल्या माहितीवरून संबंधित खाती अद्याप निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत ज्यांच्याकडे वित्त खात्याचाही ताबा आहे, त्यांनी ‘अंत्योदय धोरण’ प्रत्यक्षपणे आचरणात आणले पाहिजे आणि त्याचा लाभ गरजूंपर्यंत वेळेत पोहोचेल याची खात्री केली पाहिजे. केवळ मोठमोठ्या घोषणा करून प्रत्यक्षात काहीच न करण्याच्या ध्यासातून सरकार अजूनही बाहेर पडलेले दिसत नाही, असा टोला आलेमाव यांनी हाणला.
समाजकल्याण, महिला व बाल, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि इतर विभागांनी सुरू केलेल्या विविध सामाजिक कल्याण योजनांच्या प्रलंबित थकबाकीबाबत मी माझ्या विधानसभेतील प्रश्नांद्वारे विविध विभागांकडून माहिती घेतली होती. आकडेवारी संकलित केल्यानंतर, असे दिसून आले, की प्रलंबित थकबाकी ३३० कोटींवर गेली असून प्रलंबित रक्कम २०१६ पासून आहे, असे आलेमाव यांनी सांगितले.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी १८ जुलै २०२३ रोजी माझ्या तारांकित प्रश्न ‘१२अ’ ला दिलेल्या उत्तरात, विविध समाजकल्याण लाभार्थ्यांची ३५.७३ कोटी रक्कम प्रलंबित आहे. ज्यात कोविड-१९ झालेल्याना मदत निधी २१.५० कोटींचा समावेश आहे. कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या ८० कुटुंबांना १.६० कोटींची रक्कम वितरित केलेली नाही, असे स्पष्ट झाले आहे. उत्तरात असे म्हटले आहे, की गंभीर दिव्यांग व्यक्तींना आर्थिक साहाय्य म्हणून १.६० कोटींची रक्कम वितरित करणे बाकी आहे, मला दिलेल्या माहितीवरून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या १.३९ लाख लाभार्थ्यांना ५५.८३ कोटींची रक्कम वितरित करण्यात आली नाही, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
पायलटना 5 हजार केव्हा देणार?
कोविड काळात मोटार सायकल पायलटना पाच हजार रुपयांची मदत करणार अशी घोषणा करून सरकारने ५०० रुपये शुल्क भरून घेऊन त्यांच्याकडून अर्ज मागून घेतले होते, त्याचे काय झाले? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. काल त्यांनी मडगाव येथील पायलटांची भेट घेतली. त्यावेळी या व्यावसायिकांकडून जे ५०० रुपये घेतले होते, त्याचे सरकारने काय केले? असा सवाल करून हे सरकार गरिबांना फक्त आश्वासन देते, मात्र त्याची पूर्ती कधीच करत नाही, असेही विरोधी पक्षनेते आलेमाव म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.