Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: शिवोलीत आंब्याच्या झाडाला आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

सदरची आग कशी लागली, किती नुकसान झाले याबाबत माहिती प्राप्त होऊ शकली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa सध्या वाढत्या तापमानामुळे गोव्यात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. काल कोरगाव - देवसू येथे एका काजू बागेला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीची तीव्रता एवढी होती की. या काजू बागेसह लगतची सागवान झाडे, आंबा कलमे आणि जमा करून ठेवलेला लाकूडफाटाही आगीच्या भक्षस्थानी पडला होता. आज शिवोलीत एका आंब्याच्या झाडाला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.

सदरची आग कशी लागली, आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्याप तरी माहिती प्राप्त होऊ शकली नाहीय. मात्र ही आग लागल्याची घटना समजताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. सदरचे आंब्याचे झाड हे कित्येक वर्ष जुने असून उंच असल्याने अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागत आहेत.

आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले पाहायला मिळाले. दरम्यान सध्या गोव्यात आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मागील 48 तासात गोव्यात आगीच्या जवळपास 50 हून अधिक घटना घडल्या आहेत. अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहोचत असल्याने बऱ्याच आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

दवाखाण्यात पोहोचण्यापूर्वीच मुलाने कुशीत दम तोडला; काळीज तुटलेल्या बापाला हृदयविकाराचा झटका आला

Shristhal: श्रीस्थळ येथे जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी! दोन्ही गटांच्या तक्रारी दाखल; महिलेचा विनयभंग झाल्याचा दावा

Xeldem: 'गोव्यातील शिक्षण, संस्कृती 'मराठी'मुळेच टिकून', वेलिंगकरांचे प्रतिपादन; शेल्‍डेत मराठी राजभाषा निर्धार मेळावा

Goa Former CM Ravi Naik Dies : माजी मुख्यमंत्र्यांना अखेरची मानवंदना! गोव्यात तीन दिवसांचा दुखवटा, एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT