Kaware agricultural area Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : कावरे कृषी क्षेत्रात मँगनीज खाणीचा घाट

दैनिक गोमन्तक डिजिटल

केपे तालुक्यातील कावरे या आदिवासीबहुल गावात 70 टक्के लोकांची उपजीविका ज्या डोंगरावर अवलंबून आहे, त्या ‘जांबळीदादगो’ डोंगरावर मॅंगनीज खाण सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. ही खाण सुरू झाल्यास स्थानिक आदिवासींचा उत्पन्नाचा स्रोत नाहीसा होईल अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

या डोंगरावर स्थानिक आदिवासी लोक कुमेरी शेती करतात. तेथे लोकांच्या मोठ्या प्रमाणावर काजू बागायतीही आहेत. अशा परिसरात 70.20 हेक्टर जागेत ही खाण सुरू होत आहे. त्यासंबंधी लोकांच्या काही हरकती असल्यास 11 एप्रिल रोजी पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्याचे ठरले आहे.

मायणा सरकारी विद्यालयाच्या मैदानावर ही जनसुनावणी सकाळी 10 वाजता होणार आहे. सदर जागेत मँगनीज खाण सुरू करण्यास आमचा विरोध आहे आणि तो यापूर्वीच व्‍यक्त केला होता.

पण तो लक्षात न घेता सरकार हा प्रस्ताव पुढे नेऊ पाहत आहे. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही, असे पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते रवींद्र वेळीप यांनी सांगितले.

या जागेत स्थानिक आदिवासी पूर्वपरंपरेने कुमेरी शेती करत आहेत. अशा 170 आदिवासी लोकांनी वनाधिकार कायद्याखाली या जमिनीवर आपला दावा सांगितला आहे.

मात्र हे दावे अजूनही निकालात काढलेले नाहीत. या डोंगरावर खाण सुरू केल्यास या लोकांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती वेळीप यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT