Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: मांद्रेवासीय मांद्रेचो भूमिपुत्र भाईना प्रचंड मताधिक्य देतील; युरी आलेमाव यांचा विश्वास

Pramod Yadav

Goa Congress

येत्या लोकसभा निवडणुकीत मांद्रेवासीय पुन्हा एकदा मूक मतदानातून आपली ताकद दाखवणार आहे. ॲड. रमाकांत खलप यांचा विजय निश्चित करण्यासाठी मांद्रेकरांनी निर्धार केला आहे. मांद्रेवासीय काँग्रेसने नामांकीत केलेले इंडिया आघाडीचे उमेदवार 'मांद्रेचो भूमिपुत्र भाई' यांना निर्णायक आघाडी देतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केला.

मांद्रे मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप, आमदार ॲड. कार्लोस अल्वारेस फरेरा, काँग्रेस नेते बाबी बागकर, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर, मांद्रे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष नारायण रेडकर आदी या बैठकीला उपस्थित होते.

माझा जन्म मांद्रे गावात झाला आणि माझे या मतदारसंघाशी विशेष नाते आहे. मांद्रेचे लोक सर्व मतभेद बाजूला ठेवून माझा विजय निश्चित करण्यासाठी मला मोठी आघाडी देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे ॲड. रमाकांत खलप म्हणाले.

आपली लोकशाही धोक्यात असून हुकूमशाही मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी गोमंतकीयांची एकजूट झाली पाहिजे. इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप तुमच्या सर्व आकांक्षा पूर्ण करतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

आम्ही आमची रणनीती तयार केली आहे आणि मला खात्री आहे की ॲड.रमाकांत खलपांसारख्या अभ्यासू आणि कर्तृत्ववान उमेदवाराच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते त्यांच्या अथक परिश्रमाने योगदान देतील असे हळदोणचे आमदार व उत्तर गोवा समन्वयक ॲड. कार्लुस फेरेरा यांनी यावेळी बोलाताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT