Mandrem sarpanch adv. Amit Sawant  Dainik Gomantak
गोवा

Adv. Amit Sawant: सहा महिने बाकी असतानाही मांद्रे सरपंच अमित सावंतांनी दिला पदाचा राजीनामा...

या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

दैनिक गोमन्तक

Mandrem Sarpanch Adv. Amit Sawant Resigned

मांद्रे सरपंच ॲड. अमित सावंत यांनी अलिखित करारानुसार अजून सहा महिने बाकी असताना आपल्या पदाचा राजीनामा पंचायत संचालनालयाकडे सादर आहे. या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

पंचायत मंडळ स्थापन झाल्यानंतर माजी आमदार दयानंद सोपटे समर्थक पंचायत मंडळ सत्तेत आले होते. महेश कोनाडकर यांची सरपंचपदी निवड झाली होती. दरम्यान विधानसभा निवडणुकीत सोपटे यांचा पराभव झाल्यानंतर आमदार जीत आरोलकर यांनी सोपटे समर्थक गटात फूट पाडत ॲड. अमित सावंत यांची सरपंचपदी निवड केली होती. अलिखित करारानुसार सुरवातीची दोन वर्षे सावंत यांची या पदावर वर्णी लागली होती.

काही दिवसांपूर्वी मांद्रे मतदारसंघात सुरू केलेल्या नव्या पोलीस स्थानकाच्या उद्घाटन सोहळ्यात स्थानिक सरपंच ॲड. अमित सावंत यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. तसेच पोलीस स्थानकाच्या पाटीवरही त्यांचे नाव लिहिण्यात आले नव्हते. यावरून संतप्त सरपंचांनी उपोषणाला बसण्याचा इशारा सरकारला दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT