mandrem sarpanch land selling Dainik Gomantak
गोवा

Mandrem: मांद्रेतील जमिनी विकू देणार नाही! सरपंच फर्नांडिस यांचा निर्धार; भूमिपुत्रांसाठी जागा सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

Mandrem sarpanch land selling: कुटुंबीयांनी जमिनी बिगर गोमंतकीयांना विकण्यापेक्षा त्या भूमिपुत्रांसाठी सुरक्षित ठेवाव्यात. त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: जुनसवाडा, मांद्रे येथील गोवेकर कुटुंबीयांनी जमीन विकण्याचा सपाटा लावलेला आहे. यात आपला कसलाही हस्तक्षेप नाही. तसेच संरक्षण कठडे उभारताना कोणतेच खांब आपण मोडून टाकलेले नाहीत. आपण खांब मोडले असेल, तर त्याबाबत पुरावे सादर करावेत. गोवेकर कुटुंबीयांनी जमिनी बिगर गोमंतकीयांना विकण्यापेक्षा त्या भूमिपुत्रांसाठी सुरक्षित ठेवाव्यात. त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत दिली

जुनसवाडा, मांद्रे येथील जमिनीमध्ये संरक्षण खांब उभारताना बाउन्सर आणून दादागिरी केल्याची तक्रार गोवेकर कुटुंबीयांनी मांद्रे पोलिस स्थानकात केली आहे. तसेच याबाबत गोवेकर कुटुंबीयांनी केलेले दावे पूर्णपणे चुकीचे असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

फर्नांडिस म्हणाले की, आपण सरपंच या नात्याने कोणत्याही गैर कृत्याला थारा दिलेला नाही. तसेच एकाही बेकायदेशीर व्हिलाला परवानगी दिलेली नाही किंवा जमिनीही विकलेल्या नाहीत. कोणीही जमिनी बिगर गोमंतकीयांना विकू नये.

गोवेकर कुटुंबीयांमध्ये काही आर्थिक अडचण असेल व त्यांना आपल्या जमिनी सांभाळून ठेवायच्या असतील, तर आपण त्यांना आपल्या खात्यामधून ५० लाख रुपये खर्चासाठी देऊ शकतो. मात्र तसा करारनामा पंचायतीला लिहून द्यावा लागेल.

दिल्ली, हरियाणातून जे लोक येथे येऊन जागा विकत घेतात, त्याला आपला विरोध आहे. आपल्या कुटुंबाकडेही जागा भरपूर आहे, पण आपण कधी जागा विकली नाही. आपण गोवा विकण्यासाठी कुणाला मदतही करणार नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असे फर्नांडिस म्हणाले.

जर आपण त्यांच्या जागेत जाऊन खांबांची मोडतोड केली असेल तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. ते पुरावे सादर करावेत. त्या ठिकाणी त्यांचे मजूर होते, त्या मजुरांनीच दोन खांब हटवून जनावरांसाठी वाट मोकळी ठेवली आहे, असे ते म्हणाले.

आपल्या जागेत जाण्यासाठी वाट आराखड्यात नमूद आहे. ती पायवाट आपल्याला मिळणारच. आपण त्यांच्या जागेतून पक्का रस्ता मागत नाही, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud Case: गोव्यातील 500 जणांना 2 कोटी 90 लाखांचा गंडा, जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; सावंतवाडीतील तिघांना अटक

Shantadurga Devi Jatra: श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची जत्रा, सर्व धर्म एकतेचे प्रतिक

नाताळच्या गर्दीत जीवरक्षक ठरले 'देवदूत'! 6 पर्यटकांना जीवदान, तर हरवलेली 6 मुले पुन्हा कुटुंबाच्या स्वाधीन

पृथ्वीच्या अंगावर जसे ऋतू खेळतात त्याच प्रकारे आपल्या शरीरात पचन इंद्रिये ऋतूंचे खेळ खेळतात; विचारांचे ऋतुचक्र

'2026'चं स्वागत करा ग्लॅमरस! बागा बीचवर तमन्ना भाटिया लावणार हजेरी; असे आहेत तिकीट दर

SCROLL FOR NEXT