Mandrem Rain Dainik Gomantak
गोवा

Mandrem: धोकादायक रस्ते, ठिकठिकाणी खड्डे, रस्त्यावरती पाणी; मान्सूनपूर्व कामे खोळांबल्याने मांद्रेत स्थानिक नाराज

Mandrem Rain: आमदार जीत आरोलकर यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले, पंचायतीने पुढाकार घेऊन मान्सूनपर्व कामे करण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज होती.

Sameer Panditrao

मोरजी: मांद्रे मतदारसंघातील रस्त्याच्या बाजूला जलवाहिनी आणि भूमिगत वीज केबल घालत असताना रस्ते व्यवस्थित न बुजविल्याने मान्सूनपूर्व पावसामुळे हे रस्ते धोकादायक बनले आहेत. तसेच रस्त्यावरील गटारांचेही तीन तेरा वाजले आहे. मान्सूनपूर्व कामांना अजून सुरुवात झाली नसल्याने ही स्थिती बनली असल्याने स्थानिकांंनी नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात, आमदार जीत आरोलकर यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले, पंचायतीने पुढाकार घेऊन मान्सूनपर्व कामे करण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज होती. दोन दिवसात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून मान्सूनपूर्व कामांना गती देण्याचे प्रयत्न केले जातील, त्यांनी सांगितले.

पाणी साचले

मांद्रेत पावसाळ्यापूर्वी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यास बांधकाम खात्याला अपयश आल्यामुळे अवकाळी पावसात रस्त्यांची स्थिती धोकादायक बनली आहे.ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गटार व्यवस्था गायब असल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचत आहे. मान्सूनपूर्व कामे हाती न घेतल्यामुळे ही गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे मंगळवारी रस्त्यावरच ‘तलाव’ दिसून आले.

मोरजीत रस्ते तुंबले, चालकांची कसरत

मान्सूनपूर्व कामे न केल्याने मोरजी पंचायत क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे रस्त्यांना तलाव स्वरूप प्राप्त झाले होते.

खिंड जंक्शन, बागवाडा येथील सी हॉर्स रिसॉर्टच्या जंक्शन, विद्याप्रसारक हायस्कूल जंक्शन, मरडी वाडा ते मुनांग वाडा रस्ता, नारोजीवाडा रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT